…म्हणून बाकी शेतकरीही कांदाच लावतात, कांद्याच्या भावावरुन मंत्री कोकाटेंनी शेतकऱ्यांनाच जबाबदार धरलं

…म्हणून बाकी शेतकरीही कांदाच लावतात, कांद्याच्या भावावरुन मंत्री कोकाटेंनी शेतकऱ्यांनाच जबाबदार धरलं

Minister Manikrao Kokate)= : राज्यात सध्या कांद्याच्या भावाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कांद्याला हमीभाव मिळण्याची मागणी सर्वच शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अशातच आता कांद्याच्या भावावरुन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांनाच जबाबदार ठरवलंय. एखाद्या शेतकऱ्याला कांदा पीकातून दोन-पाच हजार मिळाले तर बाकी शेतकरीही कांदाच लावतात, असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलंय.

मानवी दात धोकादायक शस्त्र नाही; जाऊबाई कडकडून चावलेल्या मॅटरवर मुंबई HC चा निकाल

पुढे बोलताना कोकाटे म्हणाले, एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या पीकातून फायदा झाला म्हणून बाकी शेतकरी पण कांदाच लावतात. कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहेत. 50 पटीने कांद्याची लागवड केली तर दर पडणारच आहेत. कांद्याचे भाव दरवर्षी बदलत असतात, असं कोकाटेंनी स्पष्ट केलंय.

‘मंगेशकर कुटुंब लुटारूची टोळी, माणुसकीच्या नावावर कलंक’, तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी वडेट्टीवार भडकले

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कृषीमंत्री कोकाटे यांनी शेतकरी आणि कर्जमाफीबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानावरुन राज्यात चांगलाच गदारोळ झाला. विरोधकांनीही या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तंबी दिल्याचं सांगितलं जात होतं. या मुद्द्यावर बोलताना कोकाटे म्हणाले, माझा स्वभाव जन्मजात असाच आहे, माझा हेतू स्वच्छ असल्याचं स्पष्टीकरण कोकाटे यांनी दिलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube