मानवी दात धोकादायक शस्त्र नाही; जाऊबाई कडकडून चावलेल्या मॅटरवर मुंबई HC चा निकाल

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात एक अनोखा खटला समोर आला. जाऊविरोधात दाखल याचिकेत एका महिलेने मानवी दातांना (Human Teeth) धोकादायक शस्त्रात (Dangerous Weapons) टाकावे अशी विनंती केली आहे. पण मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) ही याचिका फेटाळून लावत वैद्यकीय अहवालाच्या आधारावर मानवी दात धोकादायक शस्त्र नसल्याचे म्हटले आहे. तसेच महिलेची विनंती फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय ए. देशमुख यांच्या खंडपीठाने वरील निर्णय दिला आहे. (Human Teeth Not Dangerous Weapons Says Mumbai High Court )
रोबोट्स स्वत: च निर्णय घेणार अन् जगात उलथापालथ होणार! 2030 साल कल्पनेच्या बाहेर असणार
नेमकं प्रकरण काय?
याचिकाकर्ता महिला आणि तिच्या जावेमध्ये (वहिनी) मालमत्तेचा वाद होता. जमीन, घर आणि वीटभट्टीच्या वाटणीसाठी हा खटला दाखल केला होता. या प्रकरणी दाखल एफआयआरनुसार, माहिती देणाऱ्याला अर्जदार वीटभट्टीवरून विटा वाहतूक करण्यासाठी रस्ता तयार करताना आढळले, तेव्हा त्याने अर्जदारांना न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत विटा वाहतूक करू नका असे सांगितले. यावेळी दोघींमध्ये वाद झाले. त्यावेळी वहिनीने याचिकाकर्ता असलेल्या महिलेवर हल्ला करत तिच्या उजव्या हाताचा चावा घेतला. यामुळे तक्रारदार महिलेच्या हाताला दुखापत झाली. या सर्व घटनेवेळी एकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण अर्जदार क्रमांक 1 ने त्याच्याही हाताचा चावा घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर पीडित महिलेने मानवी दात धोकादायक शस्त्र मानावे अशी विनंती न्यायालाकडे केली होती.
Human Teeth Not 'Dangerous Weapon', Injury Caused By It Falls U/S 323 IPC And Not 324 IPC: Bombay High Courthttps://t.co/yuBOHYM4YV
— Live Law (@LiveLawIndia) April 10, 2025
मानवी दात धोकादायक शस्त्र नाहीत
खरं तर, महिलेने तिच्या सासरच्यांविरुद्ध तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये तिने आरोप केला होता की, तिची जाऊ तिला चावली होती. यामुळे महिलेला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, ४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश विभा कंकणवाडी आणि संजय देशमुख म्हणाले की, तक्रारदाराच्या वैद्यकीय प्रमाणपत्रात असे दिसून आले आहे की, दातांच्या खुणांमुळे फक्त किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यामुळे मानवी दात धोकादायक शस्त्रांच्या श्रेणीत ठेवता येणार नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
Child Parenting : आई-बाबा मुलांसाठी फक्त 21 मिनिटे द्या! पॅरेंटिंगचा 7-7-7 ट्रेंड काय सांगतो?
जेव्हा घटना कलम ३२४ अंतर्गत गुन्ह्यात येत नाही, तेव्हा आरोपीवर खटला चालवणे हे कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर ठरेल असेही न्यायालयाने म्हटले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४ (धोकादायक शस्त्र वापरून दुखापत करणे) अंतर्गत, दुखापत अशा शस्त्राने झाली पाहिजे. ज्यामुळे मृत्यू किंवा गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द केल्याचे म्हटले. न्यायालयाने म्हटले की, आरोपी आणि तक्रारदार यांच्यात मालमत्तेचा वाद असल्याचे दिसते, ज्यामुळे अशी तक्रार करण्यात आली आहे.