साईबाबा साकारणारे अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती गंभीर; कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीचे आवाहन

Actor Sudhir Dalvi यांनी‘शिर्डी के साईंबाबा’ चित्रपटात साईबाबांची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं ते सध्या गंभीर आजारी आहेत.

Actor Sudhir Dalvi

Actor Sudhir Dalvi, who plays Sai Baba, is in critical condition; Family appeals for financial help : ‘शिर्डी के साईंबाबा’ या चित्रपटातील साईबाबांची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी सध्या गंभीर आजारी आहेत. त्यांना 8 ऑक्टोबर रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 86 वर्षीय दळवी यांना ‘सेप्सिस’ (Sepsis) या संसर्गजन्य आजाराने ग्रासले असून, त्यांच्यावर अतिदक्ष विभागात उपचार सुरू आहेत.

जगभरात पोहचणार जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकारामांच्या गाथेची कथा, ‘अभंग तुकाराम’ चं वर्ल्ड वाईड वितरण

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 10 लाख रुपयांचा खर्च झाला असून, डॉक्टरांनी उपचारांसाठी अजून सुमारे 15 लाख रुपयांची गरज भासेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे दळवी यांच्या कुटुंबीयांनी चाहत्यांकडे आणि चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांकडे आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.या आवाहनाला प्रतिसाद देत ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी, अभिनेता पुनीत इस्सार आणि अभिनेत्री टीना घई यांनी पुढाकार घेत आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे.

GIFF च्या “फिल्म बाजार – 2025” साठी शासनामार्फत “मुक्काम पोस्ट देवाचे घर” ची निवड

सुधीर दळवी यांनी ‘शिर्डी के साईंबाबा’व्यतिरिक्त रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मधील ऋषी वशिष्ठ, तसेच ‘जुनून’, ‘कयामत’, ‘चांदनी’, ‘तिरंगा’, ‘इंग्लिश बाबू देसी मेम’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांत आणि मालिकांमध्ये अभिनय केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतही ‘देवता’, ‘सौ. शशी देवधर’, ‘अपहरण’ अशा चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या. 1990 ते 2000 च्या दशकात त्यांनी सातत्याने काम केले असून, 2003 मधील ‘एक्सक्यूज मी’ आणि 2006 मधील ‘वो हुए ना हमारे’ ही त्यांची शेवटची उल्लेखनीय कामे होती.

 

follow us