पोर्श कार अपघात : विधानं मागे घ्या, अन्यथा 72 तासांत नोटीस धाडणार; शंभूराज देसाईंचा इशारा
Shambhuraj Desai : पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी (Pune Porsche car accident case) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) सत्ताधाऱ्यांवर सातत्याने आरोप केले. त्यांनी मंत्री शंभूराज देसाई आणि उत्पादन शुल्क विभागावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपानंतर आता मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी धंगेकर आणि अंधारेंना इशारा दिला आहे. माझ्याकडे नोटीस तयार आहे, पुढील अवघ्या बाहात्तर तासात मी संबंधितांना नोटीस बजावणार असल्याचा इशारा देसाईंना दिला.
शरद पवार पंतप्रधान होणार का? महाराष्ट्रात कुणाला किती जागा? वाचा, मारटकर यांचं भाकीत
मंत्री शंभूराज देसाई यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्यं केलं. ते म्हणाले की, पुणे विधानसभा सदस्य रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे येथील शासकीय कार्यालयात जाऊन जाब विचारला. पुण्यात घडलेल्या घडनेनंतर पोलीस उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. मात्र, आंदोलन करतांना खोक्यावर व हातात पैसे घेऊन आंदोलन केले. माझा फोटो त्यावर होता. मी तो व्हिडिओ मिळवला आणि पाहिला. त्यामुळे मी आता त्यांना नोटीस देणार आहे. यापूर्वी देखील अंधारे यांनी ललित पाटील प्रकरणात माझे नाव घेतले होते. तसेच, अंधारे यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, असेही मी स्पष्ट केले होते. त्यांनी ते मागे घेतले नाही. सध्या याप्रकरणी कोर्टात तारीख पडत आहे. न्यायालयाच्या सुटीनंतर ललित पाटील प्रकरणात लवकर तारीख द्यावी आणि माझी बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती मी न्यायालयाला करणार असल्याचं देसाई म्हणाले.
लोकसभेच्या निकालानंतर CM शिंदेंच्या खुर्चीला धोका? ‘फ्यूचर पॉलिटिक्स’मध्ये शक्यता किती..
पुढं बोलतांना ते म्हणाले की, निवडणुका असल्याने मी जबाब नोंदवायला गेलो नव्हतो. पण आता जाईन. आधीच कोर्टात केस असतांना पुन्हा पुन्हा माझ्यावर आरोप करत आहे. आज पुन्हा मी धंगेकर आणि अंधारे यांना नोटीस देत आहे. त्यांना तीन दिवसांत त्यांची विधानं मागे घ्यावीत. जर त्यांनी विधानं मागे घेतली नाही तर मी पुढे कायदेशीर कारवाईसाठी हालचाली करीन, अशा श्ब्दात देसाई यांनी थेट आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांना दिला आहे.
मनुस्मृती दहन करतांना आमदार जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांचा (Babasaheb Ambedkar) फोटो फाडल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. यावर याविषयी देसाईंना विचारले असता ते म्हणाले, आमदार जितेंद्र आव्हाडांनी देशातील बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्यांचा अपमान केला आहे, असं देसाई म्हणाले.