Video : महायुतीच बघू, पुण्यात आमची तयारी पूर्ण, धंगेकर पुन्हा भाजप विरोधात मैदानात
नगरसेवक पदासाठी अनेक तरुण आणि त्यातही उच्च शिक्षित तरुणांनी संपर्क केला आहे अशी माहितीही धंगेकर यांनी यावेळी दिली आहे.
पुण्यात 165 प्रभागात शिवसेना शिंदे गटाकडून सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्याची तयारी झाली आहे. (Pune) त्याचबरोबर लवकरच पक्षाचे अंतिम निर्णय काय असतील ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हेही आदेश देतील तसं आम्ही काम करणार आहोत अशी माहिती पुणे शिवसेना अध्यक्ष रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे. ते लेट्सअप मराठीशी बोलत होते.
नगरसेवक पदासाठी अनेक तरुण आणि त्यातही उच्च शिक्षित तरुणांनी संपर्क केला आहे, अशी माहितीही धंगेकर यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान, महायुतीच काय होईल किंवा कुणासोबत आघाडी करायची याचा निर्णय एकनाथ शिंदे हे घेतील. जो निर्णय शिंदे करतील तो आम्ही मान्य करू असंही धंगेकर यावेळी म्हणाले. आज सध्या आमची निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी झालेली आहे असंही त्यांनी सांगितलं.
आपल्याला महायुतीत दंगा नको; एकनाथ शिंदे यांची त्या वक्तव्यावरून धंगेकरांचे कान टोचले
मागील तीन निवडणुका मी काँग्रेसचा म्हणून लढलो असलो तरी, मी शिवसेनेच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला शिवसेना काही नवीन नाही असं म्हणत त्यांनी मी शिवसेनेत सध्यातरी फिट आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच, काही दिवसांपूर्वी आपण पुण्यात भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती त्यावर बोलताना धंगेकर म्हणाले, मी भाजपच्या विरोधात नव्हतो, त्यातील जी विकृती आहे त्यावर बोललो होतो असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकरांच्या काही गंभीर आरोपांमुळे भाजपच्या गोटात तीव्र नाराजीची लाट आहे. एवढंच नव्हे तर चंद्रकांत पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्यावरही शाब्दिक हल्ला चढवल्यानंतर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंनी तर थेट धंगेकरांना ठोकून काढू अशीच टोकाचीच भाषा वापरली होती. त्यामुळे आता येत्या काळात राज्यात सोबत असलेल्या या पक्षांची पुण्यात कशी वाटचाल असणार आहे हे पाहण महत्वाचं असणार आहे.
