ब्लड सॅम्पल हेराफेरीप्रकरणी मोठी कारवाई! ससूनचे डीन बदलले, तावरेसह तिघे निलंबित

ब्लड सॅम्पल हेराफेरीप्रकरणी मोठी कारवाई! ससूनचे डीन बदलले, तावरेसह तिघे निलंबित

Vinayak Kale on compulsory leave : पुण्यातील पोर्शे कार अपघात (Porsche car accident) प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मिळावा, यासाठी ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता राज्य सरकारने थेट ससूनचे डीन (Dean of Sassoon) विनायक काळेंवरच (Vinayak Kale) कारवाई केली आहे. विनायक काळेंना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

नार्को टेस्ट, रिचार्जवाली अन् सुपारी घेणारी बाई; अंजली दमानिया-सूरज चव्हाण भिडले 

ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांनी काहीच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन अपघातप्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती दिली. कल्याणीनगर दुर्घटनेनंतर रक्ताचे नमुने बदलण्यात होते. त्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हरनोळ, अतुल घटकांबळे या तिघांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर लगेचच राज्य सरकारने डीन काळे यांच्यावर कारवाई केली. डॉ.विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने त्यांच्या जागी अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (बारामती) अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

आजपर्यंत डॉ. तावरेंना कुणाचा आशिर्वाद होता?, अंबादास दानवेंचा थेट सवाल 

कठोर कारवाई करणार- मुश्रीफ
याबाबत बोलतांना हसन मुश्रीफ म्हणाले की, ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणाच्या चौकशीसाठी डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आला आहे. या अहवालानुसार डॉ.अजय तावरे आणि डॉ.श्रीहरी हळनोर यांना निलंबित करण्यात आले आहे. तर अधिष्ठाता विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. तर शिपाई अतुल घटकांबळे यालाही निलंबित करण्यात आले आहे.

मुश्रीफ पुढे म्हणाले की, ब्लडचे नमुने बदलणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. कोणत्याही सरकारी रुग्णालयात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आम्ही कारवाई करू, असं मुश्रीफ म्हणाले.

पुणे अपघात प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी रक्ताचे नमुने फेरफार प्रकरणी थेट सरकारला सवाल केले आहेत. तसेच गिरीश महाजन हे वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना केवळ डॉ. तावरे यांची बदली कशी झाली नाही, असा सवालही त्यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube