नार्को टेस्ट, रिचार्जवाली अन् सुपारी घेणारी बाई; अंजली दमानिया-सूरज चव्हाण भिडले

नार्को टेस्ट, रिचार्जवाली अन् सुपारी घेणारी बाई; अंजली दमानिया-सूरज चव्हाण भिडले

Suraj Chavhan Criticize Anjali Damania on Pune Accident : पुण्यातील कार अपघात ( Pune Accident ) प्रकरणात रोज धक्कादायक (Pune Accident) खुलासे होत आहेत. तसेच राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damania ) यांनी या अपघात प्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण ( Suraj Chavhan ) यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना दमानिया या सुपारी घेऊन आरोप करतात तसेच त्या रिचार्जवाली बाई आहेत. असे आरोप केले आहेत. हे दोघे एका वाहिनीवरील डिबेटमध्ये बोलत असताना त्यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

आजपर्यंत डॉ. तावरेंना कुणाचा आशिर्वाद होता?, अंबादास दानवेंचा थेट सवाल

काय म्हणाले सुरज चव्हाण?

चव्हाण म्हणाले की, अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाखाली राष्ट्रवादी आणि अजित पवारांना बदनाम करत आहेत. त्यामुळे त्यांचीच नार्को टेस्ट झाली पाहिजे. सीडीआर झाला पाहिजे त्याचबरोबर त्यांचे गेल्या एक महिन्यातील कॉल रेकॉर्ड तसेच त्या कोणा-कोणाला भेटल्या त्याचे लोकेशन्स तपासण्यात यावेत. अशी मागणी चव्हाण यांनी केली. तसेच त्या प्रसिद्धीसाठी आरोप करतात मात्र समोरच्याने आरोप केले की, त्या स्त्रीत्वाचं पांघरून घेतात. असं यावेळी चव्हाण म्हणाले.

T20 World Cup : टी 20 विश्वचषकात युवा खेळाडूंचा भरणा; ‘या’ मॅचविनर खेळाडूंची एन्ट्री

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

तर चव्हाण यांच्या या आरोपांना उत्तर देताना दमानिया प्रचंड संतापल्या होत्या. त्या म्हणाल्या की, सुरज चव्हाण आणि अजित पवार यांनी जी भाषा वापरली सुपारी घेणारी रिचार्जवर काम करणारी बाई ती अत्यंत खालच्या पातळीची होती. त्यावर त्यांनी माझी माफी मागावी. अन्यथा मी त्यांना सोडणार नाही असा इशारा दमानिया यांनी दिला. तसेच अशा प्रकारची खालच्या दर्ज्याचे स्टेटमेंट त्यांच्याच पक्षातील रूपाली चाकणकर, चित्रा वाघ, तसेच विरोधी पक्षातील सुप्रिया सुळे, प्रियंका चतुर्वेदी या खपवून घेणार का? असा सवाल देखील यावेळी दमानिया यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज