Sanjay Raut : फडणवीसांकडे अयोध्या आंदोलनातील फोटो… राऊत म्हणाले “ते तिथे फिरायला गेले असतील”

Sanjay Raut : फडणवीसांकडे अयोध्या आंदोलनातील फोटो… राऊत म्हणाले “ते तिथे फिरायला गेले असतील”

Sanjay Raut replies Devendra Fadnavis : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) कारसेवेला जातानाच एक फोटो एक्स अकाऊंटवर ट्विट केला आहे. यात नागपूर रेल्वे स्टेशनवरुन अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची गर्दी दिसत असून या या गर्दीतील एक जण आपणच आहोत, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. नागपूरच्या रेल्वे (Nagpur) स्टेशनवरचा तो फोटो आहे. रेल्वे स्टेशनवर तुम्ही फिरायला गेला असाल, अशी टीका राऊत यांनी केली.

1992 चे वर्ष, रेल्वे स्टेशन अन् कारसेवकांची गर्दी : फडणवीस यांचा अयोध्या आंदोलनातील फोटो सापडला

राऊत पुढे म्हणाले, फडणवीस यांनी काय ट्विट केलं माहिती नाही. पण, त्यांनी शिवसेनेच्या सहभागाविषयी प्रश्न उपस्थित केले. असे प्रश्न विचारणे हे संकुचितपणाचे लक्षण आहे. शिवसेनेने त्यावेळी काय केलं हे सगळ्या देशाला माहिती आहे. आम्हाला पुरावे देण्याची गरज नाही. आमच्याकडे सुद्धा फोटो आहेत. तुमच्याकडे फक्त नागपूर रेल्वे स्टेशनवरचे फोटो आहेत. रेल्वे स्टेशनवर तुम्ही फिरायला गेला असताल.

फडणवीसांनी आता नाशिकमधल्या डेमोक्रसी क्लबला यावं. येथे तुम्हाला कारसेवक पहायला मिळतील. तुम्ही आज विचारता की शिवसेनेचं योगदान काय. त्यावेळी हे समजण्याइतकं तुमचं वय सुद्धा नव्हतं. आधी तुम्ही इतिहास समजून घ्या आणि नंतर योगदान काय यावर विचारा, असे राऊत म्हणाले.  आमच्याकडेही लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी,उमा भारती या सगळ्यांचे फोटो आहेत, असेही खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊतांचे तीन इंद्रिये निकामी, त्यामुळं बेताल वक्तव्य; मिटकरींची जहरी टीका

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

जुनी आठवण… नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे… नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज