1992 चे वर्ष, रेल्वे स्टेशन अन् कारसेवकांची गर्दी : फडणवीस यांचा अयोध्या आंदोलनातील फोटो सापडला

1992 चे वर्ष, रेल्वे स्टेशन अन् कारसेवकांची गर्दी : फडणवीस यांचा अयोध्या आंदोलनातील फोटो सापडला

नागपूर : अयोध्येतील बाबरी मशीद नेमकी कोणी पाडली, यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपमध्ये (BJP) नेहमीच दावे-प्रतिदावे पाहायला मिळतात. विशेषतः मागील काही वर्षांपासून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकमेकांवर आरोप करताना दिसले. बाबरी शिवसैनिकांनी पाडली, त्यावेळी भाजपवाले घरात लपून बसले होते, असा आरोप ठाकरे करतात. तर मी स्वतः बाबरीचा ढाचा पाडायला उपस्थित होतो, बदायूंच्या तुरुंगामध्ये होतो, असा दावा फडणवीस करतात.

अशात येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारसेवेला जातानाच एक फोटो एक्स अकाऊंटवर ट्विट केला आहे. यात नागपूर रेल्वे स्टेशनवरुन अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची गर्दी दिसत असून या या गर्दीतील एक जण आपणच आहोत, असा दावा त्यांनी केला आहे. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis has tweeted a photo on X account while going to Karseva)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

जुनी आठवण… नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे… नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे, असेही त्यांनी म्हंटले.

भाजपकडून जय्यत तयारी :

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. देशातील विविध ठिकाणी राम मंदिर सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण दिवाळी सणासारखाच साजरा करण्यात यावा, असे आवाहन भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात येत्या 22 जानेवाारीला दिवे लावून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube