संजय राऊतांचे तीन इंद्रिये निकामी, त्यामुळं बेताल वक्तव्य; मिटकरींची जहरी टीका
Amol Mitkari on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र डागलं. कुणी काकाचा तर कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतोय अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवारांवर टीका केली. राऊतांच्या या टीकेला आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) जोरदार प्रत्युत्तर दिलं. संजय राऊतांचे 3 इंद्रिये निकामी झालेत, अशी टीका मिटकरींनी केली.
तुमचे अश्रू पुसण्यासाठी का आले नाहीत; पहिल्याच दिवशी राहुल गांधी मोदींवर बरसले!
आज अकोल्यात महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा झाला. त्या मेळाव्यानंतर मिटकरींना संजय राऊतांवर टीका केली. ते म्हणाले, संजय राऊतांच्या शरीरीतील एकून इंदियांपैकी दोन अवयव निकामी झाले आहेत. ती इंद्रिये म्हणजे जीभ आणि डोळे. तिसरा अवयव मला सांगायचाा आहे तो म्हणजे मेंदू. जेव्हा ही तीन इंद्रिये काम करत नाहीत तेव्हा हे बेताल वक्तव्य येतं. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४४ आमदार, ४ खासदरा आहे. संपूर्ण पक्ष अजित पवारांच्या पाठीशी आहे. त्यामुळं कॉंग्रेस कुणाच्या मालकीचा आहे, हे एकदा बघावं. नाहीतर तुमच्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आम्हाला करावं लागेल, असं मिटकरी म्हणाले.
राऊत नेमकं काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरेंनी काल कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केली. त्यावर बोलतांना राऊत म्हणाले की, आमचा पक्ष आहे, म्हणून उद्धव ठाकरे दौरा करत आहेत. पण तुमचा पक्ष कुठे आहे? हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष काढा. चोरलल्या पक्षावर डींग मारू नका. शिंदे आणि अजित पवारांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून दाखवावा. कुणी काकांची पक्ष चोरतोय, कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतोय. तेही दिल्लीतील दोन अनौरस बापाच्या ताकदीवर आणि निवडणुक आयोगासारख्या यंत्रणा ताब्यात घेऊन, अशी टीका राऊतांनी केली होती.
दरम्यान, आता अमोल मिटकरींना संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला. त्यांच्या टीकेला आता राऊत काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.
मेळाव्यात मिटकरी काय बोलले?
महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना मिटकरी यांनी अजित पवारांचा ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष’ असा उल्लेख केला. पुलोदचे सरकार स्थापन झाले तेव्हा जनसंघाचे लोकही सोबत होते. अजित पवारांनी असा प्रयोग केला तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. राष्ट्रवादीवर जेव्हा-जेव्हा संकट आले तेव्हा अजित पवार ढाल बनून पुढे आले, असं मिटकरी म्हणाले.
अजित पवार हे एकमेव व्यक्ती होते ज्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सातत्याने मंत्रालयात काम केले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ दोन वेळा मंत्रालयात आले होते, अशी टीकाही त्यांनी केली.