काँग्रेसशी असलेले ५५ वर्षांचे नाते संपवलं, आता शिंदेंच्या नेतृत्वात मोदींचे हात बळकट करणार; देवरांचा निर्धार
Milind Deora : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का आहे. मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश केला. देवरा यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजधानीत काँग्रेसला मोठं खिंडार पडलं. या पक्ष प्रवेशानंतर मिलिंद देवरा यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.
ठाकरेंची अडचण, भाजपची गोची अन् राज्यसभेचीही सेटिंग : एका प्रवेशाने शिंदेंचे साधले, देवरांचेही फावले
दक्षिण मुंबईच्या जागेवरून त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसला राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला.
पक्ष प्रवेशानंतर माध्यमांशी बोलतांना देवरा म्हणाले की, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खूप मेहनती आहेत. याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. सर्वांसाठी ते उपलब्ध असतात. शिंदे हे जमिनीवर नेते आहेत. सामान्य माणसाच्या वेदना आणि आशा-आकांक्षा त्यांना माहीत आहेत. त्यांच्यासारखे कष्टाळू आणि आणि मेहनती नेते कधीचं पाहिजले नाहीत. आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेसशी असलेले ५५ वर्षांचे नाते संपवत आहे. माझं राजकारण नेहमीच सकारात्मक आणि विकासाचं राहिले आहे. विधायक राहिलं आहे, असं देवरा म्हणाले.
कोल्हापूर : परतीचा संदेश घेऊन पवारांचा दूत माजी मंत्र्यांच्या घरी; बंद दाराआड दीड तास खलबत
ते म्हणाले, सर्वसामान्यांची सेवा करणे ही माझी विचारधारा आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिंदेचं व्हिजन मोठं आहे. सीएम शिंदेंच्या नेतृत्वात मुंबई आणि महाराष्ट्रात उत्तम काम सुरू आहे. मुंबई आणि महाराष्ट्राला अधिक सुरक्षित केलं जातं. त्यामुळं मला त्यांचे हात बळकट करायचे आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून केवळ शिंदेच्या हात मजबूत करायचे नाहीत, तर यशस्वी पंतप्रधान मोदी यांचेही हात बळकट करण्याचाी संधी मला मिळेल, शिंदेच्या नेतृत्वात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करायची संधी मिळेलं, असं देवरा म्हणाले.
मिलिंद देवरा यांनी अखेर आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांना भगवा झेंडा देऊन पक्षात समाविष्ट केले. यावेळी मिलिंद देवरा यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते. यावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह व्यापारी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी खासदार राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर उपस्थित होते.