पोर्शे कार अपघात प्रकरणात सायबर सेलची मोठी कारवाई, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
Porsche Car Accident Case : पुण्यातील कल्याणीनगर (Kalyaninagar) परिसरातील पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident) प्रकरणात आता पुणे सायबर सेलने (Pune Cyber Cell) मोठी कारवाई करत या प्रकरणात अल्पवयीन आरोपीचा फेक रील (Fake Reel) तयार करून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, पुणे सायबर सेलने कलम 509, 294 बी आणि आयटी कायद्याच्या 67 कलमानुसार फेक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसापूर्वी पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या व्हिडिओमध्ये तो रॅप साँग तयार करताना दिसत होता. त्याने या रॅप साँगमध्ये शिवीगाळ केले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला होता मात्र त्यानंतर हा व्हिडिओ फेक असून तो आपला मुलगा नाही. माझा मुलगा तर सध्या डिटेंशन सेंटरमध्ये आहे. त्याच्याविरोधात असे फेक व्हिडिओ व्हायरल करु नका असं स्पष्टीकरण अल्पवयीन आरोपीच्या आईकडून देण्यात आले होते.
तर आता या प्रकरणात पुणे सायबर सेलने कारवाई करत कलम 509, 294 बी आणि आयटी कायद्याच्या 67 कलमानुसार दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
तर आज अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यांनी या प्रकरणात चालकाला गुन्ह्याची जबाबदारी घेण्यासाठी दबाव टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सुरेंद्र अग्रवाल यांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
प्रकरण काय
19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात त्याला सुरुवातील अवघ्या एका दिवसात जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
‘मिताली राजसोबत लग्न करणार …’ शिखर धवनने शेअर केला ‘तो’ किस्सा