निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार टिंगरे अडचणीत? पोर्शे कार अपघातातील तरुण -तरुणीचे पालक कोर्टात जाणार

  • Written By: Published:
निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार टिंगरे अडचणीत? पोर्शे कार अपघातातील तरुण -तरुणीचे पालक कोर्टात जाणार

Sunil Tingre : वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) कल्याणीनगर (Kalyaninagar) पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident) प्रकरणामुळे सोशल मीडियावर चागलेलंच चर्चात आले आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी देखील करण्यात आली आहे मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तर पुन्हा एकदा आमदार सुनील टिंगरे यांची या प्रकरणात अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणात मृत्युमुखी पडलेले अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांच्या पालकांनी आमदार सुनील टिंगरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा आमदार सुनील टिंगरे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमदार सुनील टिंगरे यांचा या प्रकरणात सहभाग नेमका कशासाठी होता, ते पहाटे 4 वाजता येरवडा पोलिस ठाण्यात कशासाठी गेले होते याचे उत्तर मिळवण्यासाठी अनिशचे वडील उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. तसेच दोषारोपपत्रात टिंगरे यांचे नाव का? नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माध्यमांशी बोलताना मयत अनिश अवधिया याचे वडील ओमप्रकाश अवधिया म्हणाले की, येत्या काही दिवसात मी पुण्यात येणार आहे. आमदार सुनील टिंगरे यांनी आमची कोणतीही मदत केली नाही आणि आरोपीच्या बचावासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात त्यांनी नेमकं काय केले, तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच पुण्यात फायरिंग, कोयता गँगच्या बातम्या आम्ही बघत आहोत त्यामुळे पुण्यात आल्यानंतर आमच्या जीवाला कोणताही धोका तर होणार नाही ना? अशी भीती देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

जे बुद्धीला पटले तेच मी आर. आर. पाटलांबद्दल बोललो अन् आता …, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर बिल्डर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने 300 शब्दांचा निबंध, वाहतूक पोलिसांबरोबर 15 दिवस काम करणे, तसेच दारू सोडवण्यासाठी उपचार घ्यावेत, अशा अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर केला होता मात्र या निकालानंतर संतापाची लाट उसळली होती. 19 मे रोजी जी अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्शे कारने दिलेल्या धडकेत अनिश आणि अश्विनी यांचा मृत्यू झाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube