पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी आमदार सुनील टिंगरेंची चौकशी, आयुक्त अमितेश कुमार यांची कबुली…
Sunil Tingre was interrogated by police : पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी ( Porsche car accident in Pune) अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी प्रथमच याबाबत कबुली दिली. याप्रकरणी टिंगरे यांनी पोलिसांना फोन केल्याचा आरोप होता.
विनेश फोगाटचा मोठा निर्णय, राजकारणासाठी सोडली रेल्वेतील सरकारी नोकरी; राजीनामा पाठवला
पुण्यातील कल्याणीनगर भागात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन कारचालकाने दोन जणांना उडवलं होतं. त्यात दोघांचाही मृत्यू झाला होता. यानंतर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. त्यांच्यावर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील असलेले बांधकाम व्यावसायिक अग्रवाल यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केल्याचे आरोप होते.
Border 2: सनी पाजीच्या ‘बॉर्डर’ 2 मध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाला…
दरम्यान, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विषयांचा उहापोह केला. पोर्श कार अपघात प्रकरणाविषयी आमदार टिंगरेंची चौकशी झाली का, असा सवाल त्यांना केला असता ते म्हणाले, या अपघात प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ज्यांचा सहभाग आढळून आल्याचं दिसून आलं किंवा सहभाग असल्याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या, त्या सर्वांची चौकशी करण्यात आल्याचं आयुक्तांनी सांगितलं.
दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी केली. मात्र, या चौकशीत सुनील टिंगरे यांनी काय जबाब दिला, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. सुनील टिंगरे पुण्याच्या येरवडा कारागृहात काय करत होते? विशाल अग्रवालशी त्यांचा काय संबंध होता? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, आमदार टिंगरेंनी याप्रकरणी काय जबाब दिले, याची माहिती आयुक्तांनी दिली नाही.
7 हजार पोलीस बंदोबस्त तैनात
गणेशोत्सव काळात शहरात 7 हजार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. लेजर लाईटवर पूर्णपणे बंदी असणार आहे. महिलांसाठी आणि नागरिकांसाठी मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत. सोशल मीडियावरून गैरसमज निर्माण होतील अश्या पोस्टवर पोलिसांचे लक्ष असणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
आयुक्तांनी सांगितलं की, शहरातील गुन्हेगारी प्रवृतीच्या लोकांवर पोलिसांची बारीक नजर आहे. सगळ्यांना गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाणार आहे. इट का जबाब पथरसे देण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.