एसपीएफ स्पोर्ट्स मेनियात लॉन टेनिस व बॉक्स फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न
SPF Sports Mania Lawn Tennis and Box Football Championship : सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या (Surendra Pathare Foundation) वतीने 3 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत पार पडणाऱ्या एसपीएफ स्पोर्ट्स मेनियातील लॉन टेनिस व बॉक्स फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा (SPF Sports Mania Lawn Tennis and Box Football Championship) शनिवारी व रविवारी (ता. 18, 19) मोठ्या प्रतिसादात संपन्न झाली. खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, वडगावशेरी, धानोरी, येरवडा, लोहगाव येथील विविध सोसायटींमधून बॉक्स फुटबॉल स्पर्धेत 89 संघ सहभागी झाले.
तर लॉन टेनिस स्पर्धेत 184 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. “सध्या विविध क्रीडा प्रकारांत आपला भारत देश आघाडीवर पाहायला मिळत आहेत. आपले भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
एसपीएफ स्पोर्ट्स मेनियासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यामागचा हाच हेतू आहे, की राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू तयार व्हावेत. सोबतच, कामामुळे व इतर कारणांमुळे नागरिकांमध्ये आलेला दुरावा नाहीसा होऊन एकोपा तयार व्हावा. या क्रीडा महोत्सवाला स्पर्धकांचा, नागरिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. क्रीडा क्षेत्रासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत होते आहे, असे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केले.
यापुर्वी, स्केटींग, टेबल टेनिस, क्रिकेट इत्यादि स्पर्धा पार पडल्या असून, बुद्धिबळ, बॅडमिंटन, स्विमिंग, कॅरम, बास्केटबॉल या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धक खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळाने सामन्यांमध्ये रंगत आणली. प्रेक्षक नागरिकांना देखील या निमित्ताने विविध स्पर्धांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
एकनाथ शिंदे गावाला अन् त्यांचे लाडके मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत…, आदित्य ठाकरेंचा टोला
नागरिक काय म्हणतात?
खेळाडूंच्या क्रीडा प्रतिभेला वाव मिळावा, नवे खेळाडू तयार व्हावेत आणि क्रीडा क्षेत्रातही करियर घडविण्याची संधी असते या सगळ्या गोष्टींबाबत एक पोषकता निर्माण करण्याचे काम सुरेंद्र पठारे फाऊंडेशन मागील काही वर्षांपासून या स्पोर्ट्स मेनियाच्या माध्यमातून करत आहे.