Sunil Tingre : अखेर सुनील टिंगरे यांची उमेदवारी जाहीर; जगदीश मुळीक काय करणार याची उत्सुकता

  • Written By: Published:
Sunil Tingre : अखेर सुनील टिंगरे यांची उमेदवारी जाहीर; जगदीश मुळीक काय करणार याची उत्सुकता

Sunil Tingre Announced Candidate Vadgaon Sheri by NCP : पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातचा अखेर तिढा सुटला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वडगाव शेरीचे विद्यमान आमदार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आमि माजी आमदार जगदीश मुळीक देखील आग्रही होते. आज पत्रकार परिषदेवेळी सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. त्यानंतर आता मुळीकांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाने काही दिवसांपूर्वी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली होती. या यादीत 38 उमेदवारांच्या नावाचा समावेश होता. त्यानंतर आज सकाळीच अजित पवार गटाकडून दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून ४५ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. त्यापूर्वी अजित पवार गटाकडून मोठी खेळीही करण्यात आली आहे.

८५ चा फॉर्मुला अंतिम नाही; काँग्रेस १०० जागा लढवणार; वडेट्टीवारांचा दावा, काँग्रेस नेते दिल्लीला

भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील आणि भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनीही आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर संजय काका पाटील यांना तासगाव कवठे महाकाळ या विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी घोषित करण्यात आलं. तर निशिकांत भोसले पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

त्याचबरोबर भाजप नेते आणि नांदेडचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. लोहा-कंधार या विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. तसंच, गेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी अजित पवारांना अपक्ष आमदार म्हणून पाठिंबा दिला होता. मात्र, यंदा विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. ते वरुड मुर्शी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

अजित पवार गटाची दुसरी यादी

इस्लामपूर – डॉ निशिकांत पाटील
तासगाव-कवठे महांकाळ – संजयकाका पाटील
अणुशक्तीनगर – सना मलिक
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी
वडगाव शेरी – सुनील टिंगरे
शिरुर- ज्ञानेश्वर कटके
लोहा – प्रताप चिखलीकर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube