Kalyani Nagar Accident : ऑफिससमोर अपघात होऊनही माजी आमदार जगदीश मुळीक शांतचं!

  • Written By: Published:
Kalyani Nagar Accident : ऑफिससमोर अपघात होऊनही माजी आमदार जगदीश मुळीक शांतचं!

पुणे : कल्याणी नगर परिसरात भरधाव वेगातील पोर्श कारने रविवारी (दि.19) दो आयटी अभियंत्यांना धडक दिली. यात दोघांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर सुरू राज्यासह देशभरात सुरू असलेला गदारोळ सर्वांच्या वाचण्यात, पाहण्यात आणि ऐकण्यात आहे. विरोधकांनी या प्रकरणात सत्ताधाऱ्यांना आणि पोलीस प्रशासनाला अक्षरक्षः धारेवर धरले आहे. मात्र, ज्या भागात हा अपघात घडला तेथील भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या भूमिकेमुळे वेगळ्याच चर्चांनी डोकं वर काढलं आहे. (Pune Kalyani Nagar Car Accident Jagdish Mulik Reaction )

‘डॉ. तावरे एक कर्तव्यदक्ष अधिकारी..,’ ससूनमध्ये चिखल करणारं आमदार सुनील टिंगरेंचं ‘ते’ पत्र व्हायरल

कल्याणी नगर (Kalyani Nagar) भागात झालेल्या अपघाताला आता जवळपास आठवडाभर उलटून गेला आहे. देशभरात या अपघाताचे पडसाद उमटले. मात्र हा अपघात ज्या परिसरात झाला त्या परिसरातील नेते भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी सोशल मीडियातील दोन-तीन पोस्ट वगळता या सार्‍या प्रकरणावर गप्प राहणे पसंत केले आहे.

कल्याणी नगर परिसरात घडलेला पोर्श कार अपघात हा जगदीश मुळीक यांच्या कार्यालयापासून अगदी काही मीटर अंतरावर झालेला आहे. मात्र, तरीही मुळीक यांनी या अपघाताबद्दल कोणताही आक्रमक पवित्रा घेतला नाही. या भीषण घटनेनंतर मुळीक यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन पोलीस अधिकाऱ्यांची काढलेली खरडपट्टी याबद्दलचे कौतुक करणाऱ्या दोन पोस्ट मुळीक यांनी टाकल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, प्रत्यक्षात या घटनेनंतर त्या भागातील स्थानिक नेता म्हणून मुळीक यांनी आंदोलन किंवा प्रशासनाला धारेवर धरणे अपेक्षित होते. परंतु, अशा प्रकारची कोणतीही आक्रमक भूमिका मुळीक यांनी घेणे कटाक्षाने टाळले आहे.

Pune Car Accident : फोन जप्त करा, नार्को टेस्ट करा; अजितदादांचे नाव घेत दमानियांची मोठी मागणी

सुनील टिंगरे वादग्रस्त भूमिकेत

कल्याणी नगर परिसरात झालेल्या अपघातनंतर वडगाव शेरीचे विद्यामान आमदार सुनील टिंगरे हे पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर अनेक घडमोडी घडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे टिंगरे वादाचा केंद्रबिंदू ठरले असून, टिंगरे यांनी अपघातातील आरोपीच्या कुटुंबाला मदत केल्याचा आरोप केला जात आहे. परंतु, चहुबाजूंनी होणाऱ्या सर्व आरोपांचा टिंगरेंकडून इन्कार करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही ते सोशल मीडियात मोठ्याप्रमाणात ट्रोल होत आहेत.

अवैध पबविरोधात स्थानिक आक्रमक

खरेतर पुण्यातील बेकायदा पब संस्कृती, बेकायदा चालणारे हॉटेल्स याचे सर्वाधिक प्रमाण कल्याणी नगर भागात आहे. याच भागात जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक हे नगरसेवक होते. त्याशिवाय मुळीक परिवार याच परिसरात वास्तव्याला आहे. तरीही या भागातील गैरप्रकारांकडे त्यांनी आक्रमकपणे आवाज उठवला नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर, दुसरीकडे हे प्रकरण कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी चांगलेच लावून धरल्याने मुळीक यांचे मौन आणखीन नजरेत भरण्यासारखे असून, आता पुणे शहर आणि कल्याणी नगर परिसरातील नागरिकदेखील नियमबाह्य चालणाऱ्या पब, बार आणि हॉटेल यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेऊ लागले आहे. पण या भागाचे प्रतिनिधित्व करणारे मुळीक बंधू मात्र आपण त्या गावचेच नाही अशा अविर्भावात असल्याने कल्याणी नगर परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. या सर्व प्रकाराबद्दल मुळीक यांच्याची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्याशी संपर्क होताच या प्रकरणावर त्यांची बाजू सविस्तरपणे मांडण्यात येईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज