जे बुद्धीला पटले तेच मी आर. आर. पाटलांबद्दल बोललो अन् आता …, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं 

  • Written By: Published:
जे बुद्धीला पटले तेच मी आर. आर. पाटलांबद्दल बोललो अन् आता …, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं 

Ajit Pawar On R. R. Patil : तासगाव येथे महायुतीचे उमेदवार संजय काका (Sanjay Kaka) यांच्या प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (R. R. Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विरोधक अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका करत आहे. यातच आज अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना माझ्या सद्सद् विवेक बुद्धीला जे पटले तेच मी आर. आर. पाटलांबद्दल बोललो आणि याचा निवडणुकीची कोणताही संबंध नाही असं स्पष्टीकारण माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, जे काही झालं ते झालं परत आता मला उकरून काढायचं नाही. माझ्या सद्सद् विवेक बुद्धीला जे पटले तेच मी सांगितलं. त्याचा निवडणुकीशी काहीच संबंध नाही आणि माझ्या दृष्टीने तो विषय संपलेला आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जिथे अधिकचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत तिथे कसा मार्ग काढायचा यावर चर्चा झाली आहे. या संदर्भात मी बारामतीला निघालो आहे, जाता-जाता नाना काटेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्यांना भेटायला आला होतो. भोसरीची जागा भाजपला गेली आहे आणि पिंपरीची जागा राष्ट्रवादीकडे आली आहे. कार्यकर्ते, सहकारी यांच्या भावना तीव्र आहेत. प्रत्येकाला वाटत असते आम्हाला उमेदवारी मिळावी असं देखील अजित पवार म्हणाले. तसेच मावळ मध्ये देखील तिढा निर्माण झाला आहे मात्र कोणी ऐकले नाही तर कठोर भूमिका देखील घ्यावी लागेल असा इशारा देखील यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला. तसेच आम्हाला सर्वांना एकोपा ठेवून काम करायचे आहे आणि पुन्हा महायुतीचे सरकार आणायचे आहे. असेही अजित पवार म्हणाले.

सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्यावर लावलेल्या गंभीर आरोपावर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाष्य करत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आर.आर. पाटील हे माझ्या भावासारखे होते आणि त्यांचे 9 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. अजित पवार यांनी त्यांच्या निधनांतर असे आरोप करणे चुकीचे आहे. मला या आरोपांमुळे खूप दुःख झालं आहे. मी आर. आर. पाटील यांच्या कुटुंबाशी चर्चा केली आणि त्यांना मी सॉरी म्हटले. कारण मला खूप दुःख झाले आहे. अजित पवार यांच्या या आरोपांमुळे आर. आर. पाटील यांच्या आई, त्यांची पत्नी, मुलं हयात आहेत. त्यांना या आरोपांमुळे काय वाटलं असेल याचा विचार करून मी त्यांना सॉरी म्हटलं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ऐन दिवाळीत शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांना धक्का, सेन्सेक्स 553 अंकांनी घसरला

आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीची परवानगी देऊन केसाने गळा कापला असा गंभीर आरोप अजित पवार यांनी महायुतीचे उमेदवार संजय काका यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना तासगावमध्ये केला होता. त्यानंतर अजित पवार यांच्यावर चारही बाजूने टीका होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube