जरांगे पाटील तथ्थ सोडून बोलत असल्याचं समाजाला समजतय; चंद्रकांत पाटील यांची आरक्षणावर प्रतिक्रिया
BJP leader Chandrakant Patil : गणपती उत्सव उत्तम झाला. लोकांमध्ये मोठा उत्साह होता. खूप गर्दी होती. (BJP ) बाप्पालाला एकच प्रार्थना केली तुझा आज विसर्जन करत आहोत कुठलेही अडचण येऊ देऊ नको. महायुतीच सरकार पुन्हा एकदा आलं पाहिजे असं मागण मागितलं. बाप्पाचे आशीर्वाद आहेतच अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या; आज गणरायाला धुमधडाक्यात निरोप, प्रशासनही सज्ज
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही भाष्य केलं. मराठा समाजाला आता समजू लागलं आहे की मनोज जरांगे आता तथ्य सोडून बोलत आहे. तथ्य हे आहे की देवेंद्र फडणवीस यांनी रिझर्वेशन दिलेला आहे. उद्धव ठाकरेंनी आरक्षण घालवलेलं आहे. ते पुन्हा देण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे असंही पाटील यावेळी म्हणाले आहेत
कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं; शरद पवारांवर पत्रातून वार, बारामतीत गब्बर;च्या व्हायरल पत्राने वादळ
त्यावेळी का दिलं नाही
शरद पवार मंडल आयोग असताना.सुतार ओबीसीमध्ये टाकलां, लोहार टाकला. मग मराठा समाजाला टाकायला काय हरकत होती असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला आहे. 10 टक्के आरक्षण केंद्रांनी दिलं. सारखं राज्य, केंद्रावर बोट का दाखवतात. मनोज जारंगे एका मोठ्या शिखरावर गेले तिथे त्यांनी सर्वांना समान न्याय देऊन वागले तर ठीक आहे असंही पाटील म्हणाले आहेत.