मुंबईत भाजप 90 जागा जिंकणार; चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

Chandrakant Patil On BMC Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली असून

  • Written By: Published:
Chandrakant Patil On BMC Election

Chandrakant Patil On BMC Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली असून आज संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे. या निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात युती झाल्याने राजकीय समीकरणे बदली असल्याने कोण बाजी मारणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

तर आता भाजप (BJP) मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election) 90 जागा जिंकणार असल्याचा दावा राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पुणेसह सहा महापालिकांमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2014 साली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान (PM Modi) होईपर्यंत प्रचाराचा आरोप प्रत्यारोपाचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम व्हायचा. 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले. पाच वर्षांमध्ये विकासावर आणि चेहऱ्यावर परिणाम दिसले, त्यामुळे आता होत असलेले आरोप फक्त बुडबुडे आहेत. मोदींचे चिन्ह कमळ असो की मोदींचा चेहरा, लोकांचा विश्वास एकसारखा आहे असं माध्यमांसी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले.

29 महापालिकेसाठी मतदान सुरु, अनेक ठिकाणी EVM बंद; मतदान प्रक्रिया थांबली

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुण्यात 115 जागांना तर आमच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. ज्यांना पैजा लावायच्या असतील त्यांनी खुशाल लावाव्यात. मुंबईत भाजप 90 जागा आणि शिवसेना 40 जागा मिळवेल. मुंबई, ठाणे, पुण्यासह एकूण सहा महापालिकांमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे असं देखील माध्यमांशी बोलताना राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले.

follow us