Vidhansabha Election : राज्यात 100 टक्के महायुतीचेच सरकार येणार, मंत्री भुजबळांचा दावा
Chhagan Bhujbal : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली. राज्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी महायुतीकडून (Mahaytuti) रणनीती आखली जाते. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव होणार असून राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन होईल, असा अंदाज काही निवडणूकपूर्व सर्व्हेत वर्तवला जात आहे. यावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केले आहे.
20 दिवस मंत्र्याची मुलगी मोलकरणी बनून राहत होती गोविंदाच्या घरात, भांडं फुटलं अन् घडलं असं काही …
छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, मागच्या लोकसभेचा निकाल पाहून हा निकाल असाच येईल, असं नाही. मी अनेकवेळा असं पाहिलं आहे की, लोकसभेचा निकाल वेगळा, विधानसभेचा निकाल वेगळा असतो, तर महापालिकेचा निकाल आणखीन वेगळा असतो. केंद्राचे प्रश्न लोकसभेच्या वेळी वेगळे होते. त्यामुळे फेक नॅरेटिव्ह सेट झाले. संविधान बदलणार त्याचा परिणाम झाला. त्यामुळं एनडीएच्या जागाही कमी झाल्या. पण त्याचा प्रश्न इथं नाही, असं भुजबळ म्हणाले.
20 दिवस मंत्र्याची मुलगी मोलकरणी बनून राहत होती गोविंदाच्या घरात, भांडं फुटलं अन् घडलं असं काही …
ते म्हणाले, महायुती सरकारची लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील, विद्यार्थ्यांना स्टायपेंड असेल, मुलींना मोफत शिक्षण, तीन सिलिंडर मोफत, या सर्व योजनांचा परिणाम होईल. या योजनांमुळं निश्चितच महायुती आघाडी पुढे जात आहे. राज्यात महायुती आघाडीचे सरकार परत येईल, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
राज्यात 100 टक्के महायुतीचे सरकार
महाराष्ट्र आणि हरियाणात सत्ताबदल झाल्यास बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ सोडतील, असा थ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ते मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांची माहिती, त्यांचे ज्ञान माझ्यापेक्षा जास्त आहे. पण महाराष्ट्रात कोणाचंही सरकार आलं तरी चंद्राबाबूंना काय करायचं, नितीश कुमार यांना काय करायचं? त्यांना त्याच्या राज्यांचे प्रश्न मोदींसमोर जाहीर केलेले आहेत. दोन पाच ठिकाणी भाजपचं सरकार नसलं तरी काही फरक पडतन नाही. पण एक सांगतो हा नॅरेटिव्ह चुकीचा आहे. राज्यात 100 टक्के महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.
अंतरवली सराटीतील झालेल्या दगडफेक आणि लाठीमाराच्या घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार अंतवलीत ज्या वेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर जो लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे तेथून निघून गेला होता. मात्र, रात्री 2 वाजता रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगेंना तिथे परत आणून बसवलं. यानंतर तिकडे शरद पवारांना नेलं. आधी शरद पवार गेले, मग उद्धव ठाकरे हे देखील गेले. खरी परिस्थिती जी आहे, त्याची या दोघांनाही कल्पना नव्हती, असं भुजबळ म्हणाले.