20 दिवस मंत्र्याची मुलगी मोलकरणी बनून राहत होती गोविंदाच्या घरात, भांडं फुटलं अन् घडलं असं काही … 

Govinda House  : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारा बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा (Govinda) आता एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे.

  • Written By: Published:
Govinda House : 20 दिवस मंत्र्याची मुलगी मोलकरणी बनून राहत होती गोविंदाच्या घरात, भांडं फुटलं अन् घडलं असं काही ...

Govinda House  : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारा बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा (Govinda) आता एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. एका पॉडकास्टमध्ये  गोविंदाची पत्नी सुनिताने (Sunita) एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे ज्यामुळे सोशल मीडियावर (Social Media) गोविंदा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या पॉडकास्टमध्ये सुनीताने सांगितलं की, एक महिला गोविंदाची मोठी चाहती होती आणि फक्त गोविंदाला पाहण्यासाठी तिने गोविंदाच्या घरात तब्बल 20 दिवस मोलकरीण म्हणून काम केलं मात्र घरात मोलकरीण म्हणून काम करणारी ती महिला सर्वसामान्य नव्हती, ती महिला एका राजकीय नेत्याची मुलगी होती आणि फक्त गोविंदाला पाहण्यासाठी तिने मोलकरणीचं नाटक केलं होते.

या पॉडकास्टमध्ये बोलताना गोविंदाची पत्नी सुनिताने सांगितलं की, गोविंदाचे अनेक चाहते आहेत, जे त्याच्यासाठी काहीपण करू शकतात. पण अशी एक चाहती होती जी 20 दिवस आमच्या घरात राहत होती. तिने आमच्या घरात मोलकरीण म्हणून प्रवेश मिळवला पण तिच्याकडे पाहून मला ती चांगल्या घरातील असल्याचं जाणवलं होतं आणि याबाबत मी माझ्या सासूलाही सांगितलं होतं. कारण ती स्वतःला मोलकरीण म्हणत होती मात्र तिला भांडी घासणं किंवा साफसफाई करणं या गोष्टी येत नव्हत्या.

ती गोविंदासाठी रात्री उशिरापर्यंत जागी राहत होती त्यामुळे मला तिच्यावर संशय आला आणि मी तिची चौकशी सुरु केली तर एक धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे ती एका मोठ्या राजकीय व्यक्तीची मुलगी होती आणि जेव्हा तिचं सत्य आम्हाला समजलं तेव्हा ती आमच्या समोर रडू लागली आणि तिने ती गोविंदाची मोठी चाहती असल्याचं कबूल केलं.

भाजपात बंडखोरीची ठिणगी.., मोनिका राजळेंची उमेदवारी धोक्यात?

त्यानंतर तिचे वडील आमच्या घरी आले आणि तिला घेऊन गेले. तिचे वडील येताना चार कार घेऊन आले होते. ती महिला जवळपास आमच्या घरी मोलकरीण बनून 20 दिवस राहिली होती असं गोविंदाची पत्नी सुनीताने सांगितलं

follow us