मनोज जरांगेंचं सोशल मीडिया रोहित पवारांकडून चालवलं जातं; राजेंद्र राऊतांचा दावा
Rajendra Raut On Manoj Jarange : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं सोशल मीडियार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडून चालवला जात असल्याचा दावा अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी केलायं. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे आणि राजेंद्र राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. अशातच आता मनोज जरांगे यांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर राऊतांनी जरांगेंचं पडद्यामागचं सांगितलंय.
बोगस प्रमाणपत्रांचे पेव! पूजा खेडकर प्रकरणानंतर पुणे मनपाचे अधिकारी रडारवर, 6 जणांची होणार चौकशी
आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, मराठा आरक्षणाची चळवळ वेगळ्या दिशेने भटकत आहे. चळवळ अखंडपणे पुढे न्यायची की काही वेगळं साध्य करायंच आहे. मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे, आंदोलने केली पाहिजेत पण चर्चेची दारं उघडी असली पाहिजे, शिवरायांची आपल्या अष्टप्रधान मंत्रिमंडळ मांडलं होतं, पण हे महाशय कोणालाच बोलू देत नाहीत. मी काही प्रश्न केले म्हणून मलाही खडाखडा बोलत आहेत, रावणाची लंका राहिलेली नाही आणि दुर्योधनाचे काय झालं आहे सर्वांना माहिती आहे, एवढा अहंकार कामाचा नाही. जरांगे यांचं सर्व सोशल मीडिया रोहित पवार यांच्याकडून चालवला जात असून जालना हे केंद्रबिंदू तर परभणी-बीडमधून काम सुरु असल्याचा आरोप राजेंद्र राऊत यांनी केलायं.
Ajit Pawar: ..आता विधानसभेला दादांना पाडायचंय का?, गब्बरच्या ‘त्या’ पत्रामुळे बारामतीत खळबळ
तसेच जेव्हा शरद पवार बार्शीला आले, तेंव्हा दिलीप सोपल यांना भेटले. त्यावेळी माझं आणि रोहित पवारांमध्ये वाकयुद्ध सुरु झालं. तेव्हापासून जरांगे मला बोलत आहेत. एसआयटी मागे घ्या, यासाठी महाराष्ट्रातून लढणारा एकमेव आमदार आहे . मी कांही प्रश्न केले म्हणून मला ही खडाखडा बोलतायत, मराठा आंदोलकाने 11 प्रश्न विचारले आहेत त्याचे उत्तर द्या, असंही राऊत म्हणाले आहेत.
सरकारने गांभीर्याने बघावं…
समाजाच्या नावावर नौटंकी चालू आहे, मी दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करतो. मी कच्चा खिलाडी नाही बघतो करतो म्हणजे काय, आम्हाला गोळ्या घालणार असाल तर सांगा कुठे थांबू, घाला गोळ्या, मी प्रश्न विचारल्यामुळे कोणी दादागिरी घेत असेल तर सरकारने याकडे गांभीर्याने बघावं, असंही राऊत म्हणाले आहेत.
फोन करु वेडवाकडं बोलणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर
मला फोन केले जात आहेत, त्याला मी माझ्या स्टाईलने उत्तर दिलंय. कोणाला हलक्यात घेऊ नका जशास तस उत्तर दिल जाईल. मला फोन करून वेडवाकड बोललं जातं आहे, त्याला मी ही त्याच भाषेत उत्तर दिल. माझ्यावर ते किती वेळ बोलले पण मी लक्ष दिल नाही. आमच्या आई-वडिलांना कशालामध्ये आणता, माझ्यापेक्षा सोपल बरे असे ते म्हणाल्यामुळे मला वेगळाच वास आला, असल्याचा आरोपही राजेंद्र राऊत यांनी केलायं.