पुणे महापालिकेचे सहा अधिकारी रडारवर; दिव्यांग प्रमाणपत्रांची होणार चौकशी

  • Written By: Published:
पुणे महापालिकेचे सहा अधिकारी रडारवर; दिव्यांग प्रमाणपत्रांची होणार चौकशी

Bogus disability certificate : वादग्रस्त आएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून पद मिळवल्याचा आरोप आहे. हे प्रकरण देशभरात गाजले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

त्यानंतर आता दिव्यांग कल्याण मंडळाने महाराष्ट्रातील अशा संशयास्पद अधिकाऱ्यांची शोध मोहीम सुरु केली आहे. संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळणाऱ्या सहा अभियंत्यांची चौकशी करुन त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, असे निर्देश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी पुणे मनपा आयुक्तांना दिले आहेत.

Khatron Ke Khiladi 14: अभिषेक कुमार कृष्णासाठी जॅकी श्रॉफच्या घरी गेल्यावर अभिनेत्याची काय प्रतिक्रिया असेल? 

पुणे महापालिकेतील सहा अधिकाऱ्यांविरोधात हणमंत माने यांनी दिव्यांग कल्याण मंडळाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत दिव्यांग कल्याण मंडळाचे आयुक्त प्रविण पुरी यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना पत्र लिहिले आहे.

काय म्हंटले आहे पत्रात?

पुणे महानगरपालिकेमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून स्थापत्य अभियंता पदावर काहींना नोकरी मिळवली असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार या संशयास्पद अधिकाऱ्यांची शारिरीक फेरतपासणी करून अनैतिक पद्धतीने प्राप्त केलेले बोगस दिव्यांग प्रमाणपत्र रद्द करावे. तसेच संबंधित व्यक्तींनी व दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या शासकीय डॉक्टर यांना नोकरीतून बडतर्फ करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

 

दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या आणि चौकशीच्या फेऱ्यात आलेल्या अधिकाऱ्यांची यादी-

1. वाडेकर मकरंद उत्तमराव – उपअभियंता – अस्थिव्यंग
2. परदेशी अजय धनराज – शाखा अभियंता – अस्थिव्यंग
3. निखील नानासाहेब रंधवे – शाखा अभियंता – अल्पदृष्टी
4. सुनीलकुमर दत्तात्रय कोनमारे – शाखा अभियंता- अल्पदृष्टी
5. गोपाल रामदास भोयर – शाखा अभियंता – कर्णबधीर
6. धनराज गीते – कनिष्ठ अभियंता – अल्पदृष्टी

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube