मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजेंना माहितीये, राजेंद्र राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार; जरांगेंचा हल्लाबोल

  • Written By: Published:
मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजेंना माहितीये, राजेंद्र राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार; जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil On Rajendra Raut : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाची (Maratha reservation) मागणी सुरू आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी यासाठी राज्यभर दौरे सुरू केले. दरम्यान, आमदार आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मी फुकलो तरी उदयराजे भोसले लोकसभा निवडणुकीत पडले असते, असं जरांगे म्हणाले असल्याचा दावा राऊतांनी केला. राऊतांच्या या आरोपांना आता जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं.

गोदावरी एक्स्प्रेसमध्ये यंदा दिसणार नाही बाप्पा, रेल्वेचा मोठा निर्णय, 28 वर्षांची परंपरा खंडीत 

मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराजांना, कल्पनाराजे मा साहेबांना आणि छत्रपती संभाजीराजेंनी माहिती आहे, असं सांगत राजेंद्र राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Ganeshotsav 2024 : लाडक्या बाप्पाचं आगमन, राजकीय नेत्यांच्या घरीही गणराया विराजमान! 

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. राऊतांनी केलेल्या दाव्याविषयी विचारले असात ते म्हणाले की, मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराजांना, कल्पनाराजे मा साहेबांना आणि छत्रपती संभाजीराजेंना माहिती आहे. राऊत कशाचीही शपथ घेतो, माझ्याजवळ त्यांनी पाच-पन्नास शपथ घेतल्या असतील. देवेंद्र फडणवीसांचं सरकार निवडून यावं, असं तुला वाटतं तर आरक्षण का देत नाही? आम्हाला प्रश्न विचारणारा तू कोण? तुला वेळ आल्यावर कळेल देवेंद्र फडणवीस यांचे ऐकून तू किती चिखलात फसला, असं जरांगे म्हणाले.

राऊत मराठ्यांचे तुकडे करायला निघाला
पुढं ते म्हणाले, राजेंद्र राऊत आपला असून त्याच्यामध्ये फितुरीचे संस्कार आहेत. त्याच्यापेक्षा सोपल बरा म्हणावा लागले. मराठ्यांच्या विचारांचे ओबीसी आहेत, ते चांगले आहेत. अन् राजेंद्र राऊत मराठ्यांचे तुकडे करायला निघाला, असं घणाघात जरांगेंनी केला.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, राऊत मराठ्यांचे तुकडे करायला निघाला. पण, जा मीही लय बघितले लुंगे सुंगे, असं जरांगे म्हणाले. पृथ्वीवरील क्षत्रियांना कुणीतरी संपवले होते, तो वारसा आता देवेंद्र फडणवीसांनी घेतला, अशी टीकाही त्यांनी फडणवीसांवर केली.

मी परिणामांची चिंता करत नाही. श्रीमंत लोकांना आरक्षणाची गरज नाही, त्यांना मराठ्यांची गरज नाही. त्यांना फक्त राजकारणासाठी मराठे हवे आहेत. त्यांना दोष देऊन उपयोग नाही, या सगळ्यामागे फडणवीस आहेत, असं जरांगे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube