गोदावरी एक्स्प्रेसमध्ये यंदा दिसणार नाही बाप्पा, रेल्वेचा मोठा निर्णय, 28 वर्षांची परंपरा खंडीत
Godavari Express : संपूर्ण देशात आज मोठ्या उत्सहाने गणपती बाप्पाचे (Ganesh Utsav 2024) आगमान झाला आहे. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाच्या एका निर्णयामुळे गोदावरी एक्स्प्रेसमध्ये (Godavari Express) गेल्या 28 वर्षांपासून सुरु असलेली परंपरा यंदा खंडीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाने विरोध केल्यानंतर यावेळी गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणपती बसवण्यात आले नाही.
गेल्या 28 वर्षांपासून गोदावरी एक्स्प्रेसमधील पासधारकांच्या बोगीमध्ये गणपती बसवण्यात येत होते मात्र यंदा रेल्वे प्रशासनाने केलेल्या विरोधामुळे यंदा गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणपती बसवण्यात आले नाही. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात मनमाड रेल्वे स्थानकावर निषेध देखील करण्यात आला.
रेल्वे प्रवासी संघटनेकडून स्थापना मनमाड– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गणेशोत्सवात नियमित अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेतील एका डब्ब्यात गणपती बसवण्याची परंपरा सुरु केली होती. मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये दरवर्षी रेल्वे प्रवासी संघटना आणि गोदावरीचा राजा ट्रस्टतर्फे गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जात होती मात्र यंदा धावत्या रेल्वेत गणेश मूर्तीची स्थापना करण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला.
नाशिक जिल्ह्याासाठी असणारी गोदावरी एक्स्प्रेस आता धुळ्यापर्यंत चालत आहे. मात्र या निर्णयाला चाकरमाने विरोध केला होता मात्र तरीही देखील ही गाडी धुळ्यापर्यंत रेल्वे प्रशासनाने नेली. त्यामुळे मनमाड, लासलगाव आणि नाशिकमधील चाकरमाने गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणपती बसवत होते.
चित्रनगरीच्या बाप्पाचे थाटामाटात आगमन, प्राणप्रतिष्ठा करून बाप्पा झाले विराजमान
गणेश चतुर्थीच्या दिवशी गाडीच्या पासबोगीत गणरायाची स्थापना केली जात होती आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जात होते. यादरम्यान दहा दिवस पूजा-आरती करण्यात येत होती मात्र यंदा रेल्वे प्रशासनाने विरोध केल्याने ही परंपरा खंडीत झाली आहे.
Babar Azam : PCB देणार बाबर आझमला पुन्हा धक्का, पाकिस्तान क्रिकेटमध्ये लवकरच होणार मोठा निर्णय!