Ganeshotsav 2024 : लाडक्या बाप्पाचं आगमन, राजकीय नेत्यांच्या घरीही गणराया विराजमान!

Ganeshotsav 2024 : राज्यभरामध्ये आज गणपती बाप्पाचे (Ganpati Bappa) मोठ्या थाटामाटात आगमन होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बरोबरच राजकीय नेत्यांच्य घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे.

राज्याचे मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी देखील आज बाप्पाचं आगमन झालं आहे.

दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे श्री गणरायाच्या मूर्तीची एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब प्राणप्रतिष्ठा केली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी मनोभावे गणपती बाप्पाची पूजा अर्चना करत गणेशोत्सवाच्या जनेतला शुभेच्छा दिल्यात.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झालेत.

विधिवत पूजा अर्चा करत फडणवीसांनी सहकुटूंब बाप्पांची प्रतिष्ठापना केली.

खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील निवासस्थानी उत्साहात गणरायाची स्थापना करण्यात आली. शांतता टिकून राहावी, अशी त्यांनी गणरायाकडे प्रार्थना केली.

आमदार भास्करराव जाधव यांच्या घरी गणेशाचे आगमन झाले. जाधव यांनी ढोलकी वादन करत बाप्पांचं स्वागत केलं.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील घरीही गणपती बाप्पा विराजमान झालेत.
