रोहित पवार कशाला जमीन लाटेल, आम्ही मंगळसूत्र चोरत नाहीत; जितेंद्र आव्हाडांचा टोला

रोहित पवार कशाला जमीन लाटेल, आम्ही मंगळसूत्र चोरत नाहीत; जितेंद्र आव्हाडांचा टोला

Jitendra Awhad News : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर जमीन लाटल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलायं. त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सत्ताधाऱ्यांवर टोलेबाजी केलीयं. आमदार रोहित पवार कशाला जमीन लाटेल, आम्ही कानातले, मंगळसूत्र चोरत नाहीत, असा टोला आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांना लगावलायं.

मोठी बातमी! मराठा आरक्षणावरील सुनावणी तहकूब; 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी

रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील एका व्यक्तीची दोन एकर जमीन प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलायं. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, पवार यांना जमीनी लुटायचा पहिल्यापासून छंद आहे हे राज्याला माहिती आहे. त्यांना संस्थाने, रामोशी वतने, सरकारच्या जमीनी लुटायचा त्यांना नाद आहे. या प्रकरणी कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कोर्टानेही फसवणूक झाल्याचं सांगितलं आहे. पवारांचा मूळ डीएनए लबाडीचा, लुटण्याचा, आणि भ्रष्टाचाराचा आहे, रोहित पवार तिथले आमदार असल्याने प्रशासकीय अधिकारी जायभाय यांची दखल घेत नाहीत. मात्र, मी सभागृहात हा विषय मांडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचं पडळकरांनी स्पष्ट केलंय.

विधानसभा निवडणुकीपासून लांब राहणार नाही, कॉंग्रेसचा विचार…; सत्यजित तांबेंचं मोठं विधान

दोन वर्ष नाही विचारलं आता विचारता का?
मागील दोन वर्षांपासून सरकार मराठा आणि ओबीसी समाजासोबत खेळत आहे. जेव्हा सरकार दोन्ही समाजाशी खेळत होतं, त्यावेळी विरोधक आठवले नाहीत. तेव्हा आम्ही भाषणात सांगतो होतो की तुम्ही दोन समाजाशी खेळत आहात. महाराष्ट्राचा समाजव्यवस्थेत कधीही पडदा फाटला नाही. शिवरायांसोबत सर्वच समाजाचे लोकं होते. सामाजिक स्वास्थ्याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराज आहेत. तुम्हाला मराठा अन् ओबीसींना भडकावयंच होतं. आता काहीच होत नाही त्यामुळे विरोधकांना बोलवत असल्याची टीका आव्हाडांनी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज