घोंगडी, काठी सोडा अन् कुऱ्हाड हातात घ्या; गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल

घोंगडी, काठी सोडा अन् कुऱ्हाड हातात घ्या; गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल

Gopichand Padalkar on Sharad Pawar : धनगर समाजाची मागणी एसटीमधून आरक्षण अंमलबजावणीची होती. मात्र शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्री असताना संविधानात नसलेले एनटी आरक्षण (Dhangar reservation) देत धनगर समाजाची दिशाभूल केली. पवारांनीच धनगरांचा गेम केला आहे. प्रस्थापितांचे राजकारण धोक्यात येईल अशीच शरद पवारांची नीती असून शरद पवार यांच्यामुळे धनगर समाजाचे नुकसान झालं आहे. यामुळे पवारांच्या विरोधात आमचा रोष आहे, असा हल्लाबोल भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला.

शरद पवारांनी धनगरांना एनटी प्रवर्गातून आरक्षण देताना गेम केला. यामुळे घोंगडी आणि काठी हातात घेण्याऐवजी कुऱ्हाड हातात घ्यावी आणि अन्यायाविरोधात आवाज उठवा, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केला. ते कोल्हापुरात पट्टणकोडोली येथे धनगर जागर यात्रेत बोलत होते.

मीरा बोरवणकरांच्या आरोपामागे भाजपचा हात? रोहित पवारांचा मोठा आरोप

महाराष्ट्रातील धनगर झाला तर पिल्लावळीतील राज्यकर्ता तयार होणार नाही, हे पवारांना माहिती आहे. आता धनगर एकत्र येतोय, हे पवारांना माहिती झाले आहे. यामुळे शरद पवार यांनी आता धनगरांच्या संघटना फोडायला सुरुवात केली आहे. कोल्हापुरात पाच लाख धनगर आहेत. पण राजकारणात एकही आमदार, खासदार नाही. धनगरांचा पोशाख म्हणजे खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी. मात्र आता हातात काठीऐवजी कुऱ्हाड घ्यावी, कुऱ्हाड हे धनगर समाजाचे प्रतीक आहे. घोंगडी आणि कुऱ्हाड हातात घेऊन धनगर समाजाने आता अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले.

ते पुढे म्हणाले, धनगर आरक्षणाच्या बाजूने 170 पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत धनगर आरक्षणाचा निकाल लागेल. मात्रे न्यायालयीने जर काही अडचण आल्यास धनगर समाजाला रस्त्यावरील लढाई करण्याचे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

69th National Film Awards: दादासाहेब फाळके पुरस्कार स्विकारताना वहीदा रेहमान झाल्या भावुक; म्हणाल्या…

गोपीचंद पडळकर यांची धनगर जागर यात्रा आज कोल्हापुरात दाखल झाली आहे. यावेळी कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे बिरदेव मंदिरात त्यांची जागर सभा पार पडली. यावेळी ते म्हणाले की आम्ही 1960 पासून धनगर आरक्षणासाठी प्रयत्न करत आहोत. धनगर आरक्षणाची लढाई ही सध्या दोन टप्प्यात सुरु आहे. पहिला टप्प्यात न्यायालयीन लढाई तर दुसऱ्या टप्प्यात रस्त्यावरची लढाई आम्ही सुरु केली होती. धनगर आरक्षणासाठी आम्ही 170 पुरावे कार्टात दाखल केले होते. यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा निकाल लागेल, असे त्यांनी म्हटले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube