विधानसभा निवडणुकीपासून लांब राहणार नाही, कॉंग्रेसचा विचार…; सत्यजित तांबेंचं मोठं विधान

विधानसभा निवडणुकीपासून लांब राहणार नाही, कॉंग्रेसचा विचार…; सत्यजित तांबेंचं मोठं विधान

Satyajit Tambe : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) हे विधानसभा निडणूक (Vidhansabha Election) लढणार असल्याची चर्चा आहे. यावर खुद्द तांबेंनी भाष्यं केलं.

लोकसभेला सुजय विखेंना मदत केली का? आमदार सत्यजित तांबेंचं बेधडक उत्तर 

कॉंग्रेसचा विचार रक्तात असून विधानसभा निवडणुकीपासून लांब राहणार नाही, असं मोठं विधान सत्यजित तांबेंनी केलं.

लेट्सअप मराठीला आमदार सत्यजित तांबेंनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं तुमचं निलंबन झालं. मात्र, आता कॉंग्रेस आणि तुमचं मिलन कधी होणार? असा सवाल तांबेंना केला असता ते म्हणाले, काही तांत्रिक बाबींमुळं कॉंग्रेसने कारवाईचा भाग म्हणून निलंबन केलं. आता पक्ष काय भूमिका काय घेतो, हे मी सांगू शकत नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीला मी सक्षमप्रकारे काम करणार आहे. निडणुकीपासून मी लांब राहणार नाही, असं सूचक विधान त्यांनी केलं.

विधानपरिषदेत समाधानी, पण विधानसभेवर जाण्याची इच्छा..,; सत्यजित तांबेंच्या मनात नक्की काय? 

पुढं बोलतांना ते म्हणाले, माझ्या रक्तातच कॉंग्रेसचा विचार आहे. कॉंग्रेसशी विचारधारा आयडिया ऑफ इंडियाची आहे. म्हणजे, सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेणं, समानता-बंधुता ही मुल्ये अंगीकारणे आणि संविधानाचा आदर करणं या तत्वांवर विश्वास आहे. हा कॉंग्रेसचा विचार आहे, म्हणून तो माझा विचार आहे, असं नाही. तर माझाच मुळात तसा विचार आहे. मी फुले-शाहू-आंबडेकरांच्या विचारांवर चालणारी आहे, सं तांबे म्हणाले.

यावेळी बोलतांना त्यांनी नगर जिल्ह्यातील लोकसभा निडणुकीच्या निकालावरही भाष्य केलं. ते म्हणाले, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे निवडून आले. कारण, त्यांनी खासदार असतांना चांगलं नेटवर्क तयार केलं होतं. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. त्यामुंळं तेच निडणुन येतील असा अंदाज होता. मात्र, नगर दक्षिणची लढाई फारच ताकदीची होती. त्यामुळं तिथं अंदाज बांधण अवघड होतं.

सुजय विखेंनी त्यांनी खासदार म्हणून म्हणून पाच वर्ष काम केलं. त्यांचे वडील पालकमंत्री आहेत. गावपातळीपर्यंत त्यांची यंत्रणा होती. तर लंकेंनाही चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळं ही निडणुक प्रतिष्ठेची होईल, हे ठाऊक होतं. मात्र, निकालाचा अंदाज बांधता येत नव्हता. हा अपेक्षित-अनपेक्षित असा निकाल म्हणता येणार नाही. तो निकाल होता, असं तांबे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज