विधानपरिषदेत समाधानी, पण विधानसभेवर जाण्याची इच्छा..,; सत्यजित तांबेंच्या मनात नक्की काय?

विधानपरिषदेत समाधानी, पण विधानसभेवर जाण्याची इच्छा..,; सत्यजित तांबेंच्या मनात नक्की काय?

Mla Satyajeet Tambe : मी विधानपरिषदेत समाधानी आहे, पण विधानसभा निवडणुकीपासून लांब राहणार नसल्याचं मोठं विधान आमदार सत्यजित तांबे (Mla Satyajeet Tambe) यांनी केलंय. दरम्यान, लेटस्अप मराठीच्या लेटस्अप चर्चा या कार्यक्रमात सत्यजित तांबे यांची मुलाखत पार पडली. या मुलाखतीमध्ये तांबे यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय.

Government Schemes : अनुसूचित जातीच्या लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण योजना

सत्यजित तांबे म्हणाले, विधान परिषदेत मी समाधानी आहेच पण विधानसभेवर जाण्याची माझी इच्छा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपासून लांब राहणार नसल्याचं मोठं विधान सत्यजित तांबे यांनी केलं आहे. तुम्ही विधानसभा निवडणूक लढवणार आहात का? असा सवाल तांबे यांना मुलाखतीत करण्यात आला होता. त्यावर बोलताना तांबे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडत विधानपरिषदेच्या माध्यमातील विविध कामांबद्दल माहिती दिली.

विधानपरिषदेत एकू चार प्रकारची लोकं निवडून येतात. एक म्हणजे आमदारांमधून, दुसरे राज्यपाल नियुक्त, तिसरे शिक्षकांमधून, तर चौथे पदवीधरांमधून विधानपरिषदेत लोकं निवडून जात असतात. या चार प्रकारातील राज्यपाल नियुक्त वगळता इतर तिन्ही प्रकारांमध्ये विधानपरिषदेसाठी मतदान प्रक्रियेतून निवडून यावं लागतं. नाशिक पदवीधर मतदारसंघात एकूण 54 तालुके अस्तित्वात आहेत. या मतदारसंघातील 3 लाख लोकांपर्यंत प्रचार करावा लागतो, ही खूप किचकट आणि अवघड निवडणूक होती, असं सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केलंय.

Alia Bhatt: आलियाने सुरु केली ‘अल्फा’ ची शूटिंग, Photos शेअर करत दाखवली झलक

मी 54 तालुक्यांत काम करु शकतो…
विधानपरिषद हे विधिमंडळाच वरिष्ठ सभागृह आहे. विधानपरिषदेत सर्वच आमदार हे मागच्या दाराने येत नाहीत तर काही आमदारांना निवडून यावं लागतं. मी जर एकाच तालुका मतदारसंघाचा आमदार असतो तर मला एकाच तालुक्यात काम करता आलं असतं. मात्र, विधानपरिषदेत असल्याने 54 तालुक्यांत काम करता येत आहे, याचं मला समाधान असल्याचं सत्यजित तांबेंनी सांगितलंय.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून निवडून दिलेला आमदार हा फक्त शिक्षक किंवा पदवीधर लोकांसाठीच नसतो, तो विधानपरिषदेच्या सभागृहात जाऊन चांगलं काम करु शकतो. त्यासाठी सुशिक्षित मतदार विचार करुनच त्याला निवडून देत असतात, मात्र, शिक्षक आणि पदवीधरांचे आमदार हे फक्त त्यांचेचं प्रश्न मांडतात दुसरे प्रश्न मांडत नसल्याचंही तांबे यांनी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज