श्रीगोंद्यात पाचपुतेंनी गड राखला तर नेवासा नगरपंचायत शिंदेसेनेच्या ताब्यात; अहिल्यानगरमध्ये कोण विजयी कोण आघाडीवर?
Ahilyanagar मध्ये आतापर्यंत हाती आलेल्या कल आणि निकालानुसार कोण विजयी झाले आहेत जाणून घ्या सविस्तर..
Pachpute hold Shrigonda Nevasa ShivSena; who is the winner and who is in the lead in Ahilyanagar : आज राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. त्यामध्ये अहिल्यागरमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या कल आणि निकालानुसार कोण विजयी झाले आहेत जाणून घ्या सविस्तर..
अहिल्यानगर जिल्हा…
1) शेवगाव : शिवसेनेच्या उमेदवार माया मुंढे आघाडीवर असून त्यामुळे आमदार राजळे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
रत्नमाला फलके – भाजप
विद्या लांडे – राष्ट्रवादी
माया मुंढे – शिवसेना
परवीन काझी – राष्ट्रवादी (शरद पवार)
2) राहुरी : माजी आमदार प्राजक्त तनपुरेंच्या विकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब मोरे विजयी झाले आहेत. तर भाजपचे सुनील पवार पराभूत झाले आहेत.
3) श्रीरामपूर : या ठिकाणी काँग्रेसचे करण ससाणे विजयी झाले आहेत.
Akot Election : मोठी बातमी! अकोटमध्ये एमआयएमचे दोन नगरसेवक विजयी
4) संगमनेर : संगमनेर सेवा समितीच्या उमेदवार आणि सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली सत्यजीत तांबे या आघाडीवर आहेत.
मैथिली सत्यजीत तांबे – संगमनेर सेवा समिती
सुवर्णा संदीप खताळ – शिवसेना
5) शिर्डी : भाजपच्या जयश्री
जयश्रीताई थोरात – भाजप
माधुरी शेजवळ – काँग्रेस
भाग्यश्री सावकारे – शिवसेना (ठाकरे)
6) श्रीगोंदा : मध्ये भाजपच्या सुनिता खेतमाळीस या विजयी झाल्या आहेत.
7) राहाता :
डॉ. स्वाधीन गाडेकर कमळ
धनंजय गाडेकर छत्री
रामनाथ सदाफळ आप
(लोकक्रांती सेना-स्थानिक आघाडी चिन्ह छत्री)
8) जामखेड :
प्रांजल चिंतामणी भाजप
पायल बाफना शिवसेना
संध्य राळेभात राष्ट्रवादी (शरद पवार)
सुवर्णा निमोणकर राष्ट्रवादी
जैनब कुरेशी काँग्रेस
9) नेवासे : नेवासे नगरपंचायतमध्ये शिवसेनेने गडाखांना मोठा धक्का देत त्यांचे उमेदवार डॉ. करणसिंह घुले यांचा विजय झाला आहे.
10) पाथर्डी : याठिकाणी भाजपचे नगराध्यपदाचे उमेदवार अभय आव्हाड यांचा विजय झाला आहे.
11) देवळाली प्रवरा :
सत्यजित कदम-भाजप
बाबासाहेब मुसमाडे-शिवसेना
कृष्णा मुसमाडे-काँग्रेस
(माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव सत्यजित कदम)
12) कोपरगाव :
काका कोयटे राष्ट्रवादी
पराग संधान भाजप
सपना मोरे शिवसेना (उबाठा)
राजेंद्र झावरे शिवसेना
विजय वहाडणे अपक्ष
अहिल्यानगरमध्ये 11 नगरपरिषद 1 नगरपंचायतीचा निकाल जाहीर
1) राहता – भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.स्वाधीन गाडेकर विजयी
2) देवळाली प्रवरा – भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजीत कदम विजयी
3) नेवासा – शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. करण घुले विजयी
4) शिर्डी – भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री विष्णू थोरात यांची विजयाकडे वाटचाल…
5) कोपरगाव – भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान आघाडीवर
6) संगमनेर – संगमनेर सेवा समिती ( अपक्ष ) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.मैथिली तांबे यांची विजयाकडे वाटचाल..
7) श्रीरामपूर – काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाणे यांची विजयाकडे वाटचाल…
8) राहुरी – शहर विकास आघाडीचे ( अपक्ष ) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब मोरे आघाडीवर
9) श्रीगोंदा- भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता खेतमालीस विजयी…
10) पाथर्डी – भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड विजयी…
11) जामखेड- भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी यांना निर्णायक आघाडी…
12) शेवगाव- शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माया मुंडे विजयी…
