मोठी बातमी! मराठा आरक्षणावरील सुनावणी तहकूब; 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी

मोठी बातमी! मराठा आरक्षणावरील सुनावणी तहकूब; 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला (Maratha Reservation) आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यात शांतता रॅली सुरू केली आहे. या रॅलीच्या माध्यमातून ते राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजबांधवांची भेट घेत आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 10 टक्के आरक्षणाबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात या (Bombay High Court) संदर्भात आज सुनावणी झाली. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सरकारच्यावतीने राज्य मागास आयोगाकडून बाजू मांडण्यात येत आहे. मात्र, आयोगाचे वकिल विदेशात गेले असल्याने मुदतवाढ मिळावी अशी मागणी आयोगाने केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणात आता सुनावणी 5 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

Maratha Reservation: मराठा समाजातील शेवटचा माणूस.. मनोज जरांगे पाटील नांदेडच्या सभेत गरजले

राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्‍या मागासवर्गीय श्रेणीतील मराठा समाजातील नोकऱ्या आणि शिक्षणातील दहा टक्के कोट्याच्या आव्हानावर मुंबई उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी झाली. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सध्या सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत आज न्यायालयाने याचिकाकर्ते आणि राज्य सरकार यांना महत्वाचे निर्देश दिले. तसेच या प्रकरणातील सुनावणी तहकूब केली. आता पुढील सुनावणी 5 ऑगस्टपासून नियमितपणे सुरू होणार आहे.

राज्य मागास आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली. सध्या आयोगाचे वकील विदेशात गेले आहेत. त्यामुळे आयोगाने न्यायालयाला तशी विनंती केली. यानंतर न्यायालयाने तीन आठवड्यांच्या आत स्थिती स्पष्ट करावी असे निर्देश दिले. त्यामुळे आयोगाला पुढील तीन आठवडे मुदतवाढ मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.

मराठ्यांचे 2-4 माकडं फडणवीसांच्या बाजूने..,; मनोज जरांगेंच्या मनात आता नक्की काय?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube