Maratha Reservation: मराठा समाजातील शेवटचा माणूस… मनोज जरांगे पाटील नांदेडच्या सभेत गरजले

Maratha Reservation: मराठा समाजातील शेवटचा माणूस… मनोज जरांगे पाटील नांदेडच्या सभेत गरजले

Manoj Jarange Patil Marathwada visit : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा आज चौथा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, ‘आता तिसऱ्या जिल्ह्यात दौरा झाला आहे. (Manoj Jarange Patil) राज्यातील मराठा समाज आता मुलांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरलाय. (Marathwada) आम्ही आमच्या मुलांच्या न्यायासाठी का रस्त्यावर येऊ नये का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

वडेट्टीवारांची काम थांबवण्याची मागणी; महाजनांकडून उद्धव ठाकरेंचा उल्लेख, सभागृहात जोरदार घमासान

जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली. मी त्यांना समजून सांगितलं आहे. त्याचा अर्थ त्यांनी काय काढायचा तो अर्थ काढावा. ते जनतेशी खुनशीने वागतात हे त्यांच्या लक्षात आणून दिलं आहे. त्यांच्यामुळे गरिबांचं वाटोळं होतं. हे त्यांच्या लक्षात आणून दिलं आहे. त्यांना वाटतं नेते जवळ आले म्हणजे जनता जवळ आली. आता त्यांनी भुजबळ यांना जवळ केलं आहे. फडणवीस भुजबळ यांना बळ देतात हे आता जनतेच्या लक्षात आलं आहे. फडणवीस यांनी भुजबळ यांना मंत्रीपद यासाठीच दिलं आहे का? असं जरांगे म्हणाले आहेत.

मराठ्यांचे 2-4 माकड फडणवीस यांच्या बाजूने बोलतात त्यामुळे समाजात नाराजी आहे. मंत्री म्हणतात हे आरक्षण टिकणार नाही, म्हणजे आरक्षण हेच देणार आणि उडवणार हेच. म्हणजे सगेसोयरे अंमलबजावणी हे देणार आणि आणखी उडवणार हे नक्की आहे. सरसकट मागणीने यांचं फार पोट दुखतं, सगे सोयरे अंमलबजावणी यांनीच द्यायची आणि टिकवायची जबाबदारी सुद्धा यांचीच राहील. आम्हाला गॅझेटसुद्धा लागू पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

शंभूराजे देसाई यांना काल रात्री बोललो आहे. गॅझेट अंमलबजावणी होणार असं त्यांनी सांगितलं आहे. सगे सोयरे अंमलबजावणी आमच्या पद्धतीने आम्हाला हवी असं त्यांना आम्ही सांगितलं. डेड लाईन बद्दल काहीही चर्चा झाली नाही. ते देतील आणि टिकवतील. सौम्य पद्धतीने मी सरकारवर टीका करावी अशी कोणतीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तातडीने मागण्यांवर अंमलबजावणी करावी, असं जरांगे म्हणाले.

भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य; राहुल गांधींना त्याचवेळी कानशिलात मारायला हवी होती

मराठा समाजातील शेवटचा माणूस सगे सोयरेमध्ये जाईपर्यंत मी शांत बसणार नाही. मुख्यमंत्र्यांना मी 4-5 दिवसांपूर्वी बोललो होतो. जो मुलींसाठी 100 टक्के मोफत शिक्षण केलं होतं त्यांची अंमलबजावणी केली असेल तर त्यांचं अभिनंदन, सगळ्यांच्या लेकी-बाळींना त्यांच्यामुळे न्याय मिळाला त्याबद्दल सरकारचं कौतुक, पण अँडमिशन घेताना जी मुलींची फिस घेतली ती परत करा, असं ते म्हणाले.

पावसात देखील मराठे रॅलीत येणार कारण आमची आरक्षण ही वेदना आहे. काम बंद ठेऊन रॅलीत या. मराठाच राज्यात किंग राहिला पाहिजे. आमच्या विरोधात गेलेल्यांना पाडण्याची आमच्यात ताकद आहे. 2-3 टप्पे होऊ द्या मग बॉम्बच फोडणार आहे. मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना निवडून येऊ देत नाही, असंही ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube