Manoj Jarange Patil : मराठ्यांचे पाच नेते मोठे करता, पण गरिबांना काही देत नाही…

Manoj Jarange Patil : मराठ्यांचे पाच नेते मोठे करता, पण गरिबांना काही देत नाही…

Manoj Jarange Patil : मराठ्यांचे दहा-पाच नेते मोठे करता, पण गरिबांना काही देत नाही, या शब्दांत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर निशाणा साधलायं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत. नांदेडमध्ये आज मनोज जरांगे यांची शांतता रॅली निघाली. या रॅलीदरम्यान मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत सरन्यायाधीश अ‍ॅक्शन मोडमध्ये; पवारांच्या मागणीनंतर दिले महत्त्वाचे निर्देश

मनोज जरांगे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा समाजाची फसवणूक करण्यात आलीयं. ही नाराजी सर्वच भागातील मराठ्यांमध्ये आहेत. त्यांचा रोष आता बाहेर निघत आहे. ओबीसी नेत्यांना एकत्रित करुन आमच्याविरोधात फडणवीसांकडून राजकारण केलं जात आहे. छगन भुजबळ यांना फडणवीस यांनी नादी लावण्याचं काम केलं आहे. धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणाले पण आरक्षण दिलं नाही. वेगवेगळ्या जातीच्या पाच-पाच नेत्यांना ते मोठं करत असतात. बाकीचे सर्वच लोकं मारुन टाकतात. मी त्यांचा डाव ओळखला असून फडणवीस
मराठा समाज आणि ओबीसींचे पाच-पाच नेते मोठे करायचे पण गोरगरीबांना काही देत नसल्याची टीका मनोज जरांगे यांनी केलीयं.

बांधवगड राष्ट्रीय उद्यानच्या कर्मचाऱ्यांसाठी धावून आला ‘पुनीत बालन ग्रुप’, कोट्यवधींचे विमा कवच प्रदान

तसेच मनोज जरांगे पैसे घेऊन मॅनेज होणारा नाही. मनोज जरांगे हा आपल्या लेकरांसाठी लढत आहे हे आता सर्वच पक्षातील मराठा नेत्यांच्या लक्षात आलेलं आहे . आता मराठा समाज उसळून ताकतीने एकत्र आलायं. तुम्ही मराठ्यांचे नेते मोठे करा अन् तिकडचं त्यांना घेऊन जा. फडणवीसांना आम्ही हेच समजून सांगत आहोत की, आम्ही तुमचे विरोधक नाहीत आमच्या मागण्या मान्य करा मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील पण तुम्ही हे सोडता आणि काड्या करता. तुम्ही चंद्रकांत पाटील ,गिरीश महाजन, छगन भुजबळ यांना पुढं करता. असं केल्याने काय होतंय की मराठ्यांमध्ये रोष अधिक वाढत चालला असल्याचंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube