आमदारांचा निरोप समारंभ अन् देवेंद्र फडणवीसांची जोरदार फटकेबाजी, म्हणाले, जयंत पाटील हे कधी आमच्या …

आमदारांचा निरोप समारंभ अन् देवेंद्र फडणवीसांची जोरदार फटकेबाजी, म्हणाले, जयंत पाटील हे कधी आमच्या …

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधान परिषदेत (Legislative Council) निवृत्त सदस्यांच्या निरोप समारंभात बोलताना शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) हे कधी आमच्या तर कधी तुमच्या मदतीने निवडून येतात. असं म्हणत फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रश्न कुठलाही असो, या सभागृहात नेहमी जयंत पाटील उपस्थित राहतात. जयंत पाटील यांची खासियत म्हणजे सभागृहाच्या फोल विरोधात जाण्याची त्यांची ताकद आहे. सभागृहात वेगवेगळ्या चर्चा दरम्यान त्यांची भूमिका महत्वाची असते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, शेतकरी कामगार पक्षामध्ये पाटील परिवाराचा एक मोठा इतिहास राहिला आहे. त्यांच्या पक्षाचे दोन तीन आमदार आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते या सभागृहात कधी तुमच्या मदतीने कधी आमच्या मदतीने तर कधी दोघांच्या मदतीने या सभागृहात निवडणूक येतात असा चिमटाही या निरोप समारंभात जयंत पाटलांना फडणवीसांनी काढला तसेच जयंत पाटील हे शेतकरी आणि कामगारांचे नेते आहे मात्र त्यासोबत ते एक उत्तम व्यवसायिक देखील असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आज 4 जुलै रोजी विधान परिषदेमधून 15 आमदार निवृत्त होत आहे. त्यापैकी 3 आमदार पुन्हा एकदा निवडणूक जिंकून सभागृहामध्ये परतले आहे तर प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील पुन्हा एकदा विधानसभा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर अनिल परब, निरंजन डावखरे आणि किशोर दराडे यांनी निवडणूक जिंकली आहे.

हाथरस प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, 2 महिलांसह बाबांच्या 6 साथीदारांना अटक

तर विलास पोतनीस, कपिल पाटील, महादेव जानकर, मनीषा कायंदे, भाई गिरकर, बाबाजानी दुर्राणी, नीलय नाईक, रमेश पाटील , रामराव पाटील आणि वजाहत मिर्झा आज विधान परिषदेमधून निवृत्त होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज