हिंदू हिंसक! संसदेत राहुल गांधींनी जाहीर माफी मागावी; देवेंद्र फडणवीसांनी बजावलं

हिंदू हिंसक! संसदेत राहुल गांधींनी जाहीर माफी मागावी; देवेंद्र फडणवीसांनी बजावलं

Devendra Fadnvis On Rahul Gandhi : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिंदु समाजाचा अपमान करणारं विधान केलं असून त्यांनी संसदेत तमाम हिंदु समाजाची जाहीरपणे माफी मागावी, या शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी बजावलं आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी हिंदु समाजाबद्दल भाष्य केलंय. हिंदु हिंसक असल्याचं विधान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना केलंय. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस बोलत होते.

Kalki 2898 AD: परदेशात प्रभासच्या ‘कल्कि’ सिनेमाचा डंका, ‘या’ चार सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक करत रचला इतिहास

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांचं अत्यंत चुकीचं, आक्षेपार्ह विधान असून संपूर्ण हिंदु समाजाचं अपमान करणारं हे विधान आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदु समाजाला हिंसक म्हणणं अपमानजनक आहे. गांधी यांनी आपले शब्द मागे घेतले पाहिजे, लोकसभेत त्यांनी तमाम हिंदु समाजाची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Video : राज्यातील 50 लाख युवा खोटं बोलत आहेत का?; खडा सवाल विचारत रोहित पवार संतापले

तसेच भाजपकडून विधानपरिषदेसाठी पाच नावांची यादी जाहीर करण्यात आलीयं. यामध्ये पंकजा मुंडे, अमित गोरखे, योगेश तिलेकर, परिणय फुके, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आलीयं. यामध्ये पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेत उमेदवारी देण्यात यावी, असा आमचा आग्रह होता. केंद्रीय भाजपने आमची मागणी मान्य केलीयं, त्याबद्दल मी आभार मानत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
भाजपवर हल्ला करताना राहुल गांधी यांनी सभागृहात भगवान शिवचे चित्र दाखवत भाजप विरोधात आम्हाला लढण्यास मदत झाली असं ते म्हणाले. मात्र दुसरीकडे त्यांनी जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते नेहमीच हिंसाचार करतात असं देखील म्हटले आहे. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube