दहा दिवसांत तिसरी वेळ होती की ज्यावेळी पूर्ण नाव घेतलं म्हणून खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) कमालीच्या नाराज झाल्या.
खासदार जया बच्चन यांच्या नामोल्लेखावरुन संसदेत आज गदारोळ झाल्याचं समोर आलंय. सभापती जगदीप धनखड यांनी जया अमिताभ बच्चन असा नामोल्लेख केल्याने त्यांनी आक्षेप घेतला.
लोकसभा उपाध्यक्षपद आपल्याला मिळावं अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासाठी काँग्रेसने जुन्या परंपरांचा हवाला दिला आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला एका मंत्र्यावर चांगलेच भडकले. संसदेतील कामकाज सुरू असताना मंत्री खिशात हात घालून येत होते.
गुजरातमधील काँग्रेसची सध्याची परिस्थिती पाहिली तर काँग्रेस भाजपला पराभूत करू शकेल असे दिसत नाही.
काँग्रेस आज मित्रपक्षांचा पदर पकडून जिवंत, असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निकालाचा दाखला देत काँग्रेस पक्षाला जागा दाखवलीयं. ते लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
मी काँग्रेसमधून जिंकून आलो होतो, याचा मला अभिमान असल्याचं राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यसभेत स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना चव्हाण यांनी विरोधकांवर टोलेबाजी केलीयं.
सरकारने जातीनिहाय जनगणना करावी, तसेच इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे- अमोल कोल्हे
मला बोट दाखवलं तर तोडण्याची ताकद आहे, या शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमकावलं आहे. दरम्यान, विधिमंडळात आज दानवे आणि लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झालीयं.
संसदेत राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावलंय. दरम्यान, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना हिंदु समाजाबद्दल अवमानजनक भाष्य केलं होतं.