भाजपचे अशोक चव्हाण म्हणतात, काँग्रेसमधून निवडून आल्याचा मला अभिमान…
Ashok Chavan : मी काँग्रेसमधून जिंकून आलो होतो, याचा मला अभिमान असल्याचं राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राज्यसभेत स्पष्ट केलंय. दरम्यान, भाजपकडून राज्यसभेत संधी मिळाल्यानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशनात बोलत होते. ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलत होते. यावेळी बोलताना चव्हाण यांनी चारोळीतून भाष्य करीत विरोधकांना चपराक मारलीयं.
राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार अशोक चव्हाण यांनी सहभाग घेतला. यावेळी सभापती जगदीप धनखड यांनी अशोक चव्हाणांची सभागृहाला ओळख करुन दिली. अशोक चव्हाण हे लोकसभा सदस्य, दोनवेळा आमदार, आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले असल्याचं धनखड यांनी सांगितलंय. त्यानंतर सभागृहाला ओळख करुन दिल्याबद्दल चव्हाण यांनी आभार मानले असून मी काँग्रेसमधून जिंकून आलो होतो, याचा अभिमान असल्याचं म्हटलंय.
जित पर कभी अहंकार नहीं किया…
जित पर कभी अहंकार नहीं किया, किसी हारपर कभी रोया नहीं. लेकिन हर हार के बात कभी चैन से बैठा नहीं, या शब्दांत चारोळी म्हणत अशोक चव्हाण यांनी विरोधकांना चपराक दिलीयं.
आमच्या काही सदस्यांना नांदेडमध्ये चांगलीच रुची असून ते म्हणत होते की, इथे पराभव, तिथे पराभव पण जेव्हा काँग्रेसला कुठेच जागा मिळाली नव्हती तेव्हा काँग्रेसला नांदेड आणि हिंगोलीत जागा मिळाली होती, त्या यशात माझा छोटासा वाटा असल्याची आठवण अशोक चव्हाण यांनी यावेळी करुन दिलीयं.
दरम्यान, मी जे काही काम केलंय ते प्रामाणिकपणे केलंय. तिथून जागा निवडून आणल्या आहेत. काही सदस्य असेही आहेत ज्यांच्या जिल्ह्यात पंचायत समितीचेही सदस्य निवडून आले नसल्याचाही टोला अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर लगावला आहे.