अशोक चव्हाणांना सोबत घेऊनही भाजपची दमछाक? नांदेडमध्ये काँग्रेसचं पारडं जड

अशोक चव्हाणांना सोबत घेऊनही भाजपची दमछाक? नांदेडमध्ये काँग्रेसचं पारडं जड

विद्यमान खासदार भाजपचेच. जिल्ह्यातील चार आमदार महायुतीचे. तरीही भाजपने (BJP) अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासारख्या तगड्या काँग्रेस (Congress) नेत्याला सोबत घेतले. राज्यसभेवर खासदार केले. अशोक चव्हाण यांना सोबत घेण्यास भाजपची अन्य समीकरणे असतीलही. पण नांदेड, हिंगोलीची लोकसभेची जागा आणि मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा प्रभाव कमी करणे ही प्रमुख कारणे होती. अशोक चव्हाण सोबत आल्याने सुरुवातीला नांदेडची लढाई एकतर्फी वाटत होती. पण मतदानापर्यंत ही लढाई अक्षरशः अटीतटीची झाली होती. आता मतदानानंतर महिन्याभराच्या काळात जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांतून जी चर्चा बाहेर येत आहे; जे अंदाज वर्तविले जात आहेत ते चव्हाण आणि भाजपची घालमेल वाढविणारे आहेत. तर काँग्रेसचं पारडं जड वाटत आहे. (In Nanded Lok Sabha Constituency, Congress has a chance to win in the battle between BJP and Congress.)

नेमके काय घडले आहे नांदेडमध्ये आणि काँग्रेसचं पारडं जड का वाटत आहे? पाहुया सविस्तर…

नांदेड लोकसभा मतदारसंघात हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. आधी शंकरराव चव्हाण आणि त्यांच्या पश्चात अशोक चव्हाण आणि भास्करराव खतगावकर या प्रभावशाली नेत्यांनी ही ओळख मिळवून दिली. 1996 च्या निवडणुकीपासून बघितले तर इथे कायमच काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली. यात 2004 आणि 2019 चा अपवाद वगळता काँग्रेसचं पारडं जड राहिलं. 2019 मध्ये तर अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर अशी लढत झाली होती. यंदाच्या निवडणुकीआधी मात्र अशोक चव्हाण आणि भास्करराव खतगावकर हे दोन्ही नेते आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये गेले, त्यांनी या पक्षासाठी आपली संपूर्ण राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत प्रचार केला. पण या प्रचाराचा फारसा फायदा झालेला दिसला नाही. मतदान झाल्यानंतर गेल्या चार आठवड्यांत जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांतून जी चर्चा बाहेर येत आहे; जे अंदाज वर्तविले जात आहेत, ते चव्हाण, खतगावकर आणि भाजप या साऱ्यांची घालमेल वाढविणारे आहेत.

Video : कल्याणीनगर अपघात प्रकरण कुणी दाबलं?; ससूनचे डीन डॉ. काळेंनी सांगितली Inside Story

याचे सगळ्यात पहिले कारण म्हणजे, गतवेळीपेक्षा यंदा नांदेडमध्ये मतदानाची टक्केवारी कमी राहिली. यंदा नांदेड लोकसभेसाठी 60.94 टक्के इतके मतदान झाले. 2019 साली नांदेड लोकसभेसाठी 65.18 टक्के मतदान झाले होते. यातही भाजपच्या दोन प्रमुख मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी राहिली. मुखेड हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. राजेश राठोड हे इथले विद्यमान आणि सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार आहेत. याच मतदारसंघातून गतवेळी चिखलीकरांना इतर मतदारासंघाच्या तुलनेत सर्वाधिक 30 हजारांची आघाडी मिळवून दिली होती. पण इथे अवघे 56 टक्के मतदान झाले आहे. तर नांदेड उत्तरमध्ये शिवसेनेचे बालाजी कल्याणकर आमदार आहेत. त्यांच्याही मतदारसंघात अवघे 58 टक्के मतदान झाले.

याच्या अगदी उलट परिस्थिती काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राहिली. भोकर हा काँग्रेस हक्काचा मतदारसंघ समजला जातो. पण इथे अशोक चव्हाण यांचाही शब्द प्रमाण मानला जातो. त्यामुळे इथे काँग्रेस विरुद्ध अशोक चव्हाण अशी लढाई झाली. यात अशोक चव्हाण यांच्याबद्दलच्या नाराजीमुळे काँग्रेसचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे. भोकमध्ये यंदा सर्वाधिक 65.37 टक्के मतदान झाले आहे. हे मतदान अशोक चव्हाण यांना धक्का देणारे असल्याचा अंदाज इथले पत्रकार वर्तवतात.

अशोक चव्हाणांबद्दल मतदारसंघात बरीच नाराजी दिसून आली. अशोक चव्हाण आल्याने आपल्याला फायदा होईल सा भाजपला कयास होता. मात्र काही माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी वगळता चव्हाणांपाठोपाठ एकही मोठा नेता भाजपमध्ये कोणीही गेले नाही. माधवराव पाटील जवळकर, मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर हे जिल्ह्यातील तिन्ही आमदार काँग्रेससोबतच राहिले आहेत. नायगावचे माजी आमदार आणि सध्याच्या उमेदवार असलेले वसंतराव चव्हाण हेही काँग्रेससोबतच राहिले. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यानंतरही काँग्रेस पक्षाची नांदेडमधील स्थिती मजबूत मानली जात आहे.

विशाल अग्रवालकडे कुठल्या मंत्र्यांचे पैसे अडकलेत, त्याची चौकशी करा; आंबेडकरांची मागणी

याशिवाय संपूर्ण प्रचारातही अशोक चव्हाण मुक्तपणे फिरताना दिसून आले नाहीत. त्यांना त्यांच्या भूमिकेबद्दल ठामपणे काही सांगता आले नाही. भाजपात का गेलो, हे त्यांनी सर्वत्र सांगितले, तरी शंकररावांची सर्वसमावेशक भूमिका सोडून ते भाजपात गेल्याची बाब समर्थनीय किंवा त्यांना बळ देणारी ठरली नाही. नांदेड दक्षिण आणि देगलूर या काँग्रेसचे आमदार असलेल्या दोन्ही मतदारसंघातही 60-60 टक्के मतदान पार पडले. नायगाव हा काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा घरचा मतदारसंघ. इथूनच ते आमदार होते. गतवेळी चिखलीकरांना आघाडी मिळाली होती. मात्र चव्हाण यांनी घरच्या मतदारसंघातून लीड घेण्यासाठी बरेच कष्ट घेतलेले दिसून आले. नायगावमध्ये 65.32 टक्के मतदान झाले.

भाजपचे चिंता वाढण्याचे आणखी उदाहरण म्हणजे, मराठा आरक्षण इफेक्ट. राज्याच्या अन्य भागाच्या तुलनेत मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा बराच प्रभाव दिसून आला. मराठवाड्यातील काही मतदारसंघांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी किंवा हिंदू-मुस्लीम असे ध्रुवीकरण बघायला मिळाले. याच आरक्षण विषयात भाजप आणि शिंदे सरकारकडून झालेल्या निराशेची तीव्रता नांदेडमध्ये ठळकपणे बघायला मिळाली. या पार्श्वभूमीवर मराठा समाज काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचे दिसले. या पक्षाचे उमेदवार वसंत चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाचा या समाजात असलेला प्रभाव तसेच जिल्हाभरातील त्यांची नातीगोती- सगेसोयरे याचा लाभ काँग्रेसला झाला, असे मानले जात आहे.

अमित देशमुखांनी वैयक्तिक घातलेले वैयक्तिक लक्ष :

मराठवाड्यात अमित देशमुखांनी वैयक्तिक घातलेले वैयक्तिक लक्ष हे भाजपच्या चिंतेचे तिसरे कारण आहे. मराठवाड्यात अमित देशमुख विरुद्ध अशोक चव्हाण असा सुप्त संघर्ष मागील काही वर्षांपासून सुरु होता. अशात चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर मराठवाड्यात देशमुख यांना खुले मैदान मिळाले आहे. आता देशमुख यांनी नांदेड, लातूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये वैयक्तिक लक्ष घातले आहे. अगदी उमेदवार निवडीपासून ते प्रचाराचे नियोजन, प्रत्यक्ष प्रचार यामध्ये देशमुख यांचा सहभाग आहे. त्यामुळे काँग्रेसच्या संघटनेला चव्हाणांनंतरही नांदेडमध्ये नेतृत्वाची कमतरता जाणवलेली नाही.

अॅन्टी इन्कंबन्सी फॅक्टर?

भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. 2009, 2014 असे सलग दोन्हीवेळी इथून काँग्रेसने विजय मिळविला आहे. 2019 मध्ये प्रताप पाटील चिखलीकर अवघे 40 हजार मतांनी निवडून आले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या फॅक्टरने काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा पराभव झाल्याचे बोलले गेले. आता चिखलीकर यांच्यासोबत चव्हाण आहेत. मात्र त्यांना अॅन्टी इन्कंबन्सी सामना करावा लागत असल्याचे दिसून आले. या अॅन्टी इन्कंबन्सीवर भाजपने नेमके कसे काम केले हे आता चार जूनलाच समजून येईल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube