कौल्हापुरच्या रणरागिणीने मैदान मारलं! नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले तीन सुवर्ण
2023 साली नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत चकमदार कामगिरी करत तीन सुवर्णांसह बेस्ट स्विमरचा पुरस्कार पटकावला होता.
कौल्हापुरच्या पठ्ठने मैदान मारलं आहे. (Sports) हैदराबाद येथे सुरू असलेल्या 25 व्या पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये रिया पाटीलने तीन सुवर्ण पटकावत धडाकेबाज कामगिरी केली. तसंच या स्पर्धेतील ‘ज्युनियर प्लेअर ऑफ टुर्नामेंट’ बहुमानही तिने पटकावला. या स्पर्धेत पदकतालिकेत कर्नाटक राज्य पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
रिया पाटीलने S-5 ज्युनिअर कॅटेगरीमध्ये पहिल्या दिवशी 100 मीटर फ्री स्टाईल आणि 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्ण पटकावत महाराष्ट्राचे खाते उघडले. दुसऱ्या दिवशीही तिने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक पटकावलं. रिया पाटील हिने सुरुवातीला 100 मीटर फ्री स्टाईलमध्ये अप्रतिम कामगिरी करत महाराष्ट्रासाठी पहिले पदक जिंकले. ही कामगिरी तिने 3.12 मिनिटात पूर्ण केली.
न्यूझीलंडला मोठा धक्का, शतक झळकावणारा फलंदाज मालिकेतून बाहेर
यानंतर 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्येही तिने कामगिरीमध्ये सातत्य ठेवत सलग दुसरे सुवर्णपदक नावावर केलं. 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकार तिने 1.42 मिनिटे इतक्या विक्रमी वेळेत पूर्ण केला. हैदराबाद येथे 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान 25 व्या पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत देशभरातून शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये रिया पाटीलने अभिमानास्पद कामगिरी करत महाराष्ट्र आणि कोल्हापूरचे नाव उंचावले.
रियाने विक्रम वेळेसह ही तीनही सुवर्ण जिंकली आहेत. तसेच गुवाहाटी आणि दिल्लीमध्ये तिने या आधी नोंदवलेले स्वतःचे राष्ट्रीय विक्रमही तोडले आहेत. त्यामुळे रिया पाटीलवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. रिया पाटीलने तिच्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवल्याचं दिसून येतंय. गेल्या वर्षी गोव्यामध्ये झालेल्या 24 व्या पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने तीन सुवर्ण पटकावले होते. 10 मीटर फ्री स्टाईल, 50 मीटर फ्री स्टाईल आणि 50 मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारात रियाने सुवर्ण पटकावले होते.
2023 साली गुवाहाटी येथे पार पडलेल्या नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत चकमदार कामगिरी करत तीन सुवर्णांसह बेस्ट स्विमरचा पुरस्कार पटकावला होता. तसेच दिल्ली येथे झालेल्या पहिल्या CPSFI स्पर्धेत रियाने एक सुवर्णपदक आणि दोन रौप्यपदक पटकावले होते. रिया पाटील ही कोल्हापूरची खेळाडू असून ती सध्या सदर बाजार येथील सागर पाटील जलतरण तलाव या ठिकाणी प्रॅक्टिस करते. रियाला कोल्हापूर पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनचे विनायक सुतार, प्रशिक्षक अमर पाटील, अस्मिता म्हाकवे आणि काशीनाथ भिसे यांचे मार्गदर्शन लाभले.
