Video : कल्याणीनगर अपघात प्रकरण कुणी दाबलं?; ससूनचे डीन डॉ. काळेंनी सांगितली Inside Story
DR. Vinayak Kale Porsche car accident : पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर येथे पोर्श कार (Porsche car accident) आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, आता ससूनचे डीन डॉ. विनायक काळे (Vinayak Kale) यांनी पत्रकार परिषद घेत हे अपघात प्रकरण कुणी दाबलं? यावर थेट भाष्य केलं.
विशाल अग्रवालकडे कुठल्या मंत्र्यांचे पैसे अडकलेत, त्याची चौकशी करा; आंबेडकरांची मागणी
विनायक काळेंनी आज पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, डॉ. अजय तावरे यांच्याकडून न्याय वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख चार्ज काढून घेतला आहे. आता हा चार्ज विजय जाधव यांच्याकडे दिला आहे. अतुल घटकांबळे या शिपायााला देकील निलंबित केले आहे. तर वैद्यकीय क्षेत्रातील दुसरे मुख्य आरोपी असलेले श्रीहरी हळनोर हे तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने २८ तारखेला त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
उत्तर भारत पोळला! दिल्लीत तापमान 52 डिग्री पार; उष्णतेचे सगळेच रेकॉर्ड मोडीत
यावेळी काळे म्हणाले की २७ मे रोजी ससूनमधील डॉ. श्रीहरी हळनोर, डॉ. अजय तावरे, आणि अतुल घटकांबळे यांना पोलिसांनी अटक केली. या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन फौजदारीपात्र कट रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता इतर आरोपीच्या मदतीने विधिसंघर्षित बालकचे रक्ताचे नमुने न घेता इतर व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेवून ते सिलबंद करुन ताब्यात दिल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालं. त्यानंतर तावरेंकडील पदभार काढण्यात आल्याचं काळे म्हणाले. ते म्हणाले, ससून रुग्णालयासाठी ही बाब अत्यंत वाईट अत्यंत वाईट आहे. अशा प्रकारे फेरफार करणे चुकीचे आहे.
माझ्याकडूनही विभागीय आयुक्त आणि आमच्या वरिष्ठांनी माहिती मागितली आहे. पोलिसांनी मागितलेली माहिती त्यांना देण्यात आल्याचं काळे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की तसेच या प्रकरणात चौकशी करण्याकरीता शासनस्तरावरुन डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता (ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समुह रुग्णालय, मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त (वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई) यांची त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या चौकशी समितीने काल ससून रुग्णालयाच्या या प्रकरणाची चौकशी केलेली आहे.
डॉ.पल्लवी सापळेंनी घेतली मुश्रीफांची भेट…
ससून रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करणाऱ्या समितीच्या प्रमुख डॉ.पल्लवी सापळे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे चौकशीची अहवाल सोपवला. रुग्णालयाची चौकशी केल्यानंतर साबळे यांनी मुश्रीफ यांची भेट घेतली.