उत्तर भारत पोळला! दिल्लीत तापमान 52 डिग्री पार; उष्णतेचे सगळेच रेकॉर्ड मोडीत

उत्तर भारत पोळला! दिल्लीत तापमान 52 डिग्री पार; उष्णतेचे सगळेच रेकॉर्ड मोडीत

Delhi High Temperature : राजधानी दिल्लीत उष्णतेचे सगळेच रेकॉर्ड मोडले गेले आहेत. आज येथे उष्णता इतकी वाढली होती की तापमान राजस्थानातील शहरेही मागे पडली आहेत. आज दिल्लीतील मुंगेशपूर भागात सर्वाधिक म्हणजेच तापमान तब्बल 52.3 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार आज दुपारी दिल्लीत पारा 50 डिग्रीच्या पुढे गेला. मुंगेशपूर भागात दुपारी अडीच वाजता तापमान 52.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. मागील काही दिवसांपासून दिल्लीतील तापमानात मोठी वाढ होत आहे. दिल्लीचे उपराज्यपालांनी आज मोठा निर्णय घेत कामगारांना दुपारी 12 ते 3 यावेळेत पगारी सुट्टी जाहीर केली.

दिल्लीत अग्नितांडव! हॉस्पिटलला भीषण आग; सहा नवजात बालकांचा मृत्यू

दुपारनंतर मात्र येथील तापमानात अचानक बदल झाला. पावसाने हजेरी लावली त्यामुळे तापमान कमी झाले. कडाक्याच्या उन्हातून दिल्लीकरांची सुटका झाली. परंतु, आजचा बुधवारचा दिवस दिल्लीकरांसाठी चांगलाच हैराण करणारा ठरला. फक्त दिल्लीच नाही तर उत्तर भारतातील अन्य शहरांतही आज तापमानात मोठी वाढ झाली होती.

राजस्थानातील फलौदी शहरात तापमान  51 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हरियाणतील सिरसा शहरातही तापमानाने पन्नाशी पार केली. येथे आज दुपारी 50.3 अंश सेल्सिअस होते. मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये तापमान 48 अंश सेल्सिअस नोंदले गेले.  दिल्लीतील नरेला भागात आजचे तापमान 47.9 अंश सेल्सिअस इतके प्रचंड होते. हरियाणातील रोहतक शहरात 47.7, राजस्थातील चुरूमध्ये 47.4 अंश सेल्सिअस, बिकानेरमध्ये 47 अंश सेल्सिअस, हरियाणातील जगदीशपूरमध्ये 46.5 अंश सेल्सिअस तर राजस्थानातील श्रीगंगानगर शहरात 46 अंंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले.

PMC : तापमान वाढणार! महानगरपालिकेकडून पुणेकरांसाठी उष्माघातासंबंधी सूचना जारी

दरम्यान, ईशान्य उत्तर प्रदेश आणि पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशाच्या पश्चिम भागात एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे. कोरडे हवामान राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच येत्या काही दिवसात किमान तापमानात किंचित मात्र कमाल तापमान लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेचा त्रास किंवा उष्णतेचे संबंधी आजार होऊ नये. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज