Sassoon Hospital Dean : डॉ. विनायक काळे ससूनमध्ये ‘बॅक टू पॅव्हेलीयन’
Sassoon Hospital Dean : पुण्याच्या ससून रूग्णालयाचे डीन ( Sassoon Hospital Dean) डॉक्टर संजीव ठाकूर यांना राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात पदमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्या जागी डॉक्टर विनायक काळे यांना ससूनचे डीन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र काळे हे काही नव्याने ससूनचे डीन झाले नाहीत. ते या अगोदर देखील या पदावर होते. मात्र जानेवारी महिन्यात अचानक त्यांची बदली करण्यात आली होती. त्यावर त्यांनी आक्षेप घेत मॅटमध्ये दावा दाखल केला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांचे ससूनमध्ये पुनरागमन झाले आहे.
डॉ. विनायक काळे ससूनमध्ये ‘बॅक टू पॅव्हेलीयन’…
दरम्यान विनायक काळे यांचं प्रकरण असं की, काळे हे ससूनच्या डीनपदी कार्यरत असताना जानेवारी महिन्यामध्ये अचानक त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच संजीव ठाकूर यांना ससूनच्या डीन पदाचा पदभार सोपविण्यात आला होता. मात्र आपल्या या बदलीवर काळे यांनी आक्षेप घेत या संदर्भात मॅटमध्ये दावा दाखल केला होता. त्यामध्ये 14 जुलैला मॅटने काळेंच्या बाजूने निकाल दिला. पण त्या विरोधात ठाकूर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र यावर निकाल देताना न्यायालयाने डॉक्टर संजीव ठाकूर यांची नियुक्ती रद्द केली होती.
Dance Plus Season: देशातील सर्वात लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
त्यानंतर आता वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. विनायक काळे यांना पुन्हा ससूनच्या डीन पदी रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. आजच काळे हे पदभार स्विकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही तासांतच त्यांचं आता पुन्हा त्यांचे ससूनमध्ये पुनरागमन होणार आहे. दरम्यान संजीव ठाकूर यांना हटवल्यापासूनच काळे हे पदावर येण्याची शक्यता होती. अखेर ते परत आले आहेत.
ललित पाटील प्रकरणात डीन संजीव ठाकूर यांना हटवले…
ललित पाटील प्रकरणात चर्चेत आलेले ससून रूग्णालयचे डीन संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) यांची नेमणूक रद्द करण्यात आलेली आहे. काँग्रेसचे खासदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ललित पाटीलला पळवून लावण्यात ठाकूर यांचा हात असल्याचे गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर त्यांना ससूनच्या डीन पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या ससूनचे डॉक्टर प्रविण देवकाते यांनी एक धक्कादायक दावा केला होता.
साडीमध्ये शिल्पाचा स्टायलिश अंदाज
ते म्हणाले होते की, ललित पाटील हा ड्रग्ज माफिया होता हे मला माहिती नव्हते. त्याचबरोबर तो वेगळ्या कारणासाठी वेगळ्या विभागात रूग्णालयात दाखल झाला होता. तसेच त्याच्यावर माझ्याकडे उपचार नंतर सुरू करण्यात आले. तसेच मी हे उपचार ससूनचे डीन म्हणजे डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या आदेशानुसारच करत होतो. असा दावा देवकाते यांनी केला होता.