विशाल अग्रवालकडे कुठल्या मंत्र्यांचे पैसे अडकलेत, त्याची चौकशी करा; आंबेडकरांची मागणी

विशाल अग्रवालकडे कुठल्या मंत्र्यांचे पैसे अडकलेत, त्याची चौकशी करा; आंबेडकरांची मागणी

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणातील (Pune Accident) आरोपी विशाल अग्रवालकडे (Vishal Agrwal) कोणत्या मंत्र्याचे पैसे अडकलेत, त्याची चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलीयं. दरम्यान, पुणे अपघात प्रकरणावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याचं दिसून येत आहे. अशातच आता या अपघात प्रकरणात आंबेडकरांचीही एन्ट्री झालीयं.

Pune Car Accident : ब्लड सॅम्पल बदलणं भोवलं! दोन डॉक्टर अन् शिपायाचं निलंबन…

आंबेडकर म्हणाले, पुणे अपघात प्रकरणात मंत्र्याचे फोन केल्याची चर्चा आहे. विशाल अग्रवालची कोण-कोणत्या राजकीय नेत्यांसोबत पार्टनरशिप आहे. कोणत्या मंत्र्याचे पैसे विशाल अग्रवालकडे अडकलेले आहेत. याची चौकशी करावी, चौकशी करुन कोणी फोन केला हे पोलिसांना विचारण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केलीयं.

Pune News : पुण्यात चाललंय तरी काय? पोलिस आयुक्तालयाजवळच दारुच्या बाटल्यांचा खच…

दुसरं म्हणजे अपघात वाढत चालले आहेत. त्यामुळे अल्पवयीन आहे म्हणून त्याला कमी शिक्षा हा नवीन नियम आला आहे त्याला शिथिल करायला हवे. बार संदर्भात सुद्धा नियम करण्यासंदर्भात आबेडकरांनी सल्ला दिला आहे. 18 वर्षाखालील मुलांना बार किंवा पबमध्ये प्रवेश दिला जाऊ नये, त्यांना प्रवेश देणाऱ्या मालकाला 3 वर्ष शिक्षा, त्याचा परवाना रद्द करावा आणि दहा लाख रुपये दंड करावा अशी तरतूद परवन्यामध्येच करावी, अशीही मागणी आंबेडकरांनी केलीयं.

बिल्डर विशाल अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षाला पैसा पुरवला? व्यवसायात कोणाची भागीदारी? याचा खुलासा झाल्यानंतरच विशाल अग्रवालला वाचवणारी सगळीच नावे समोर येणार असल्याचा दावा आंबेडकरांनी केलायं. आंबेडकर म्हणाले, अशा अनेक केसेस घडलेल्या आहेत. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी तिथे असणाऱ्या डॉ. जोंधळे यांनाही असंच फरफटत नेलं. डॉ. जोंधळेंचे नाव कुठेही येत नाही, त्यांनाही असंच मारण्यात आलंय. या प्रकरणामागे जे काही राजकारण असेल पण हा वाहनचालकांचाच निष्काळजीपणा असून कडक शिक्षा झाली पाहिजे, असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज