पुणे कार अपघातात पुन्हा एका नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांकडे भक्कम पुरावे असून लवकरच आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे.
पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल, वडिल विशाल अग्रवाल यांना 5 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीयं.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना हिट अँन्ड रन प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वेगात स्कार्पीओ चालवत दोन वाहनांना धडक दिली.
पुणे अपघातातील आरोपीचं रक्ताचं सॅम्पल बदलल्याप्रकरणी अटकेत असलेले डॉ तावरे न्यायालयात म्हणाले, रक्ताचं सॅम्पल कचऱ्यात टाकलं नाही.
सातारा जिल्हा प्रशासनाकडून विशाल अग्रवालला दणका देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महाबळेश्वरमधील बार प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे.
पुणे अपघात प्रकरणी पोलिसांची वागणूक आणि ससूनमधला हलगर्जीपणा भ्रष्टाचाराचं लक्षण असल्याची टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीयं.
पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालकडे कोणत्या मंत्र्याचे पैसे अडकलेत, त्याची चौकशी करण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केलीयं.
पुणे अपघात प्रकरणात आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हालनोर, शिपाई अतुल घटकांबळेचं निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आलीयं.
विशाल अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षाला पैसा पुरवला? कोणाची भागीदारी? याचा खुलासा झाल्यानंतरच त्याला वाचवणाऱ्यांची नावे समोर येणार असल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे.
आपला चेहरा अन् चमकोगिरीसाठी लोकं प्रयत्न करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला आमदार संजय शिरसाट यांनी आमदार रविंद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंना लगावलायं.