विशाल अग्रवालला दणका! महाबळेश्वरमधील बार प्रशासनाकडून सील…

विशाल अग्रवालला दणका! महाबळेश्वरमधील बार प्रशासनाकडून सील…

Pune Car Accident : पुणे अपघात प्रकरणातील (Pune Accident) आरोपी बिल्डर विशाल अग्रवाल (Vishal Agrwal) याला सातारा जिल्हा प्रशासनाकडून मोठा दणका देण्यात आलायं. महाबळेश्वरमधील एमपीजी क्लबमधील बार सातारा जिल्हा प्रशासनाकडून सील करण्यात आलायं. सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आलीयं. महाबळेश्वरमधील विशाल अग्रवालचे हे हॉटेल अनधिकृत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीयं.

मी तुमच्या नोटीसीला भीक घालत नाही; शंभूराज देसाईंच्या अल्टिमेटवर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

पुण्यातील कल्याणीनगर भागात 19 मेच्या पहाटे विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत तरुण-तरुणाला चिरडलं. या दुर्देवी घटनेत तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अल्पवयीन मुलावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याला जामीन मिळाल्याने पुणेकरांसह राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर बाल हक्क न्यायालयाने त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात ठेवलं.

या घटनेमध्ये पोलिसांकडून आरोपीला व्हिआयपी ट्रीटमेंटसह सहकार्य केलं असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असल्याचं दिसून आलं. अशातच अल्पवयीन मुलाच्या कृत्यामुळे त्याचे वडिल विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी विशाल अग्रवाल याला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली.

राहुल गांधी अमेरिकेचेही राष्ट्राध्यक्ष होतील, मुंगेरीलाल के हसीन सपने…; फडणवीसांचा खोचक टोला

तर पोलिस तपासामध्ये अल्पवयीन मुलगा अपघाताच्या रात्री पबमध्ये मद्य प्राशन करीत असल्याचं समोर आलं. मात्र, त्याला अटक केल्यानंतर त्याच्या मेडिकल रिपोर्टच्या आधारे त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. मेडिकल रिपोर्टमध्ये त्याने मद्य प्राशन केलं नसल्याचं समोर आलं होतं. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक केली.

पोलिस चौकशीमध्ये विशाल अग्रवालसोबत अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅंपल बदलण्याबाबतच संभाषण झालं असल्याचं कबुलीच डॉक्टरांनी दिली. या प्रकरणाी डॉ. अजय तावरे यांनीच माझ्यावर ब्लडचे सॅंपल बदलण्यासाठी दबाव टाकला होता. त्यामुळेच ब्लड सॅंपल बदलले असल्याची कबुली डॉ. श्रीहरी हळनोर याने पोलिसांना दिलीयं. एवढचं नाही तर डॉ. तावरे याला विशाला अग्रवाल याने व्हॉटस्अप कॉल्स केले असल्याचंही तपासात समोर आलं होतं.

दरम्यान, या प्रकरणी विशाल अग्रवालसह डॉ. अजय तावरे, श्रीहरी हळनोर, अतुल घटकांबळे यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असतानाच आता सातारा जिल्हा प्रशासाकडून अग्रवालच्या बारवर कारवाई करण्यात आलीयं. त्यामुळे विशाल अग्रवालला कुठूनच सुट्टी मिळत नसल्याचं दिसून येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज