मी तुमच्या नोटीसीला भीक घालत नाही; शंभूराज देसाईंच्या अल्टिमेटवर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

मी तुमच्या नोटीसीला भीक घालत नाही; शंभूराज देसाईंच्या अल्टिमेटवर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

Sushma Andhare On Shambhuraj Desai : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातानंतर आरोपीला वाचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं केलेलं गैरकृत्य उघडकीस आल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका केली. वींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) पुण्यातील उत्पादन शुल्क कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. याशिवाय उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर देसाईंनी धंगेकर आणि अंधारेंना नोटीस बजावणार असल्याचा इशारा दिला. त्याला आता सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं.

मणिपुरी फॅशन ब्रँड ‘हाऊस ऑफ अली’साठी सनी बनली शोस्टॉपर; पाहा दिलखेचक फोटो 

माझा आवाज कोणी बंद करू शकत नाही, असल्या इशाऱ्यांनी मी भीक घालत नाही, अशा शब्दात सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलं.

फक्त सभागृहात तंबाखू चोळतात...
शंभूराज देसाईंना नोटीस बजावणार असल्याच्या इशाऱ्यावर बोलतांना अंधारे म्हणाल्या की, एका पोर्श कार अपघात प्रकरणाने या राज्यातील गृह खाते, उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभागाला भ्रष्टाचाराने कसं पोखरून टाकलं, हे समोर आलं. जेव्हापासून शंभूराज देसाईंकडे उत्पादन शुल्क खातं आलं तेव्हापासून नाशिक, संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी सातत्यानने ड्रग्जचे साठे सापडत आहेत. आणि शंभूराज देसाई फक्त सभागृहात तंबाखू चोळत बसतात, असा टोला अंधारेंनी लगावला.

पुढं बोलतांना त्या म्हणाल्या की, शंभूराज देसाई हे उत्पादन शुल्क मंत्री आहे. त्यांनी दारू, गुटखा आणि तंबाखुला पायबंद घातला पाहिजे, मात्र तेच सभागृहात तंबाखु चोळतात. त्यांच्यावर वर्मावर बोट ठेलंलं तर ते मी तुमच्यावर अब्रुनुकासीनाचा दावा ठोकेल, असा इशारा देऊन विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतात. नोटीसा धाडण्याचा इशारे देत एकप्रकारे ते हुकूमशाही व्यवस्थेत असल्यासारखं वागत आहेत. आम्हाला इशाऱे दिल्यापेक्षा त्यांनी ललित पाटील प्रकऱणात झालेली नाचक्की, पुण्यामध्ये चालू असलेल्या पब बारमुळं खात्याची चव्हाट्यावर आलेली अब्र सांभाळावी, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

अब्रनुकसानीचे दावे करून सुषमा अंधारेंचा आवाजा बंद करू शकत नाही. मी तुमच्या नोटीशींना आणि इशाऱ्यांना भीक घालत नाही, माझी लढाई मी चालूच ठेवणार आहे, असंही अंधारेंनी स्पष्ट केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज