‘धुरळा’ सिनेमा स्टाईल निवडणूक भोवली; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची लेक,मुलगा, सून, पुतण्या चारही जण पराभूत
भाजपचे जेष्ठ नेते सुरेश वरपूडकर यांच्या घराणेशाहीला मतदारांनी नाकारलं आहे. त्यांच्या घरातील थेट पाच पैकी चार उमेदवारांचा दारूण पराभव झाला.
BJP leader Suresh Varpudkar 4 Family members defeated in Parbhani ZP election : राज्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या अगोदर नगर परिषदा, नंतर महानगर पालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये जय-पराजय, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, मतदारांनी नाकारलेली घराणेशाही असं सगळं काही दिसलं. नेत्यांच्या घरातील एकाच वेळी अनेक लोकांना उमेदवारी दिली गेल्या आपण अनेकदा पाहिलं पण मतदारांनी या घराणेशाहीला थेट तोंडावर पाडलं आहे. याचच एक उदाहरण म्हणजे परभणीतील भाजपचे जेष्ठ नेते सुरेश वरपूडकर यांच्या घराणेशाहीला देखील मतदारांनी नाकारलं आहे. त्यांच्या घरातील थेट पाच पैकी चार उमेदवारांचा दारूण पराभव झाला. एक उमेदवार जिंकला तोही काँग्रेसच्या तिकीटावर
मुलगा, मुलगी, सून, पुतण्या पराभूत…
परभणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जेष्ठ नेते सुरेशवरपूडकर यांनी त्यांचे पुत्र समशेर, मुलगी सोनल, सून प्रेरणा आणि पुतणे उत्कर्ष यांना उमेदवारी दिली होती. मात्र या सर्वांचा पराभव झाला आहे. यामध्ये सिंगणापूर गटावतून शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग खिल्लारे यांनी समशेर वरपूडकर यांचा पराभव केला. झरी गटातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत असलेल्या वरपूडकरांची मुलगी सोनल देशमुख यांना भाजपच्या दिलीप देशमुख यांनी पराभूत केले.
Nirmala Nawale : सोशल मीडियावर लाखोंची पसंती, पण निवडणुकीत नाकारलं…
दैठणा गटातून भाजपकडून उभ्या असलेल्या वरपूडकरांच्या सुनबाई प्रेरणा वरपूडकरांना काँग्रेसच्या ज्योत्सना घाटगे यांनी पराभूत केले. ज्योत्सना घाटगे वरपूडकरांच्या जुन्या सहकाऱ्याच्या रामभाऊ घाडगे यांच्या सूनबाई आहेत. त्यामुळे हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा आहे. तर लोहगाव गटातून वरपूडकर यांचे पुतणे भाजपचे उमेदवार उत्कर्ष वरपूडकर यांना काँग्रेसच्या अजित वरपूडकर म्हणजे त्यांच्या भावानेच चितपट केले.
कोण आहेत सुरेश वरपूडकर ?
सुरेश वरपूडकर (Suresh Warpudkar) हे गेल्या चार दशकांपासून राजकारणात असून, परभणी जिल्ह्यातील मोठे राजकीय नेते आहेत. ते सिंगनापूर, पाथरी विधानसभा मतदारसंघातून तब्बल पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. तर परभणी लोकसभा मतदारसंघातून ते खासदार राहिलेले आहेत. काँग्रेसकडून ते सहा महिन्यांसाठी राज्यमंत्री राहिलेले आहेत.
मोठी बातमी! ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडली, पुण्याला रुग्णालयात हलवलं
परंतु 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वरपुडकरांना मतदारांनी नाकारले होते. 2019 ला पाथरी विधानसभा मतदारसंघातून ते पुन्हा विधानसभेत गेले होते. परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. गेल्याच वर्षी ते भाजपमध्ये दाखल झालेत. ते एक प्रभावी नेते आहेत. नुकतेच पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावत भाजपच्या विजयामध्ये मोठी भूमिका पार पाडली होती.
मराठी मनोरंजन विश्वात सुंदर योग! नव्या कलाकृतीसाठी मनवा नाईक-गौरी कालेलकर-चौधरी एकत्र
यामध्ये महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून परभणीची जबाबदारी माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्यावर होती. या ठिकाणी भाजपला काही खास करता आले नाही येथे उबाठा शिवसेनेने सत्ता मिळवलीय. भाजपला येथे यश आले नसले तर सुरेश वरपूडकर यांच्या पत्नी मीनाताई वरपूडकर या नगरसेवक निवडून आलेल्या आहेत. त्या परभणीच्या महापौरही राहिलेल्या आहेत. मात्र यावेळी त्यांना घराणेशाहीमुळे पिछाडीवर जावं लागलं आहे.
