LetsUpp Special: सुषमा अंधारेंनी माझ्याविरोधात कट केलाय; मुरलीधर जाधवांचा गंभीर आरोप

  • Written By: Published:
LetsUpp Special: सुषमा अंधारेंनी माझ्याविरोधात कट केलाय; मुरलीधर जाधवांचा गंभीर आरोप

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Hatkanangle Lok Sabha) जागेवरून झालेल्या वादातून उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (Murlidhar Jadhav) यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. तब्बल 19 वर्ष जिल्हाप्रमुख राहिलेले मुरलीधर जाधव यांना पदावरून काढल्याने ते ढसाढसा रडले होते. त्यामुळे ते चर्चेत आले आहे. त्यांनी लेट्सअपशी संवाद साधला. त्यात जाधव यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare) गंभीर आरोप केला आहे. सुषमा अंधारे यांनी माझ्याविरोधात कट केला आहे. तो कट कोण्यासाठी केला आहे हेही जाधव यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का ? यावरही जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘माझा नवरा वाघ…मी वाघाची वाघीण’; मारेकऱ्यांना शरद मोहोळच्या पत्नीचा इशारा…

पक्षाने जिल्हाप्रमुखपदावरून काढल्याबद्दल जाधव म्हणाले, 22 फेब्रुवारी 2005 रोजी माझी कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाली होती. त्यापूर्वी हातकणंगले तालुक्याचा मी तीन वर्ष अध्यक्ष राहिलेलो आहे. त्याच्या अगोदर पाच वर्ष हुपरी शहरप्रमुख म्हणून काम केले आहे. सातत्याने आंदोलने-मोर्चे काढले आहेत. या भागात शिवसेनेचे अस्तित्व नव्हते. आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेचे अस्तित्व निर्माण केले आहे. त्याचे फळ म्हणून जिल्ह्यात 2014 मध्ये दोन खासदार, सहा आमदार निवडून आले होते. परंतु मी फक्त राजू शेट्टी यांच्याविरोधात एक स्टेटमेंट केले. हातकणंगले लोकसंघ मतदारसंघात शिवसेनेने निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. उपरा, स्वार्थासाठी गोडगोड बोलणारा उमेदवार नको आहे. राजू शेट्टी हे 2014 मध्ये महायुतीकडून तिकीट घेऊन निवडून आले होते. त्या 2014 विधानसभा निवडणुकीत.भाजप-शिवसेनेची युती फिसकटली होती.


सत्तेचा अहंकार सोडा, तलाठी भरतीवरुन रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात

उद्धव ठाकरे हे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना सांगत होते. तुम्ही आमच्याबरोबर राहा असे हात धरून सांगत होते. मी साक्षीदार आहे, मातोश्रीतील त्या घटनेचा. त्यावेळी राजू शेट्टी भाजपबरोबर निघून गेले. माझे म्हणणे फक्त एेवढेच होते. माझ्या नावाला कुणाचा विरोध असेल तर या भागातील माजी आमदार उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील यांना उमेदवारी द्या. शिवसैनिकालच उमेदवारी द्या. दुसऱ्या कुणाला देऊ नका, ही माझी मागणी होती, असे मुरलीधर जाधव म्हणाले.

सुषमा अंधारे व मिणचेकर यांचे सख्य, चार महिने कट शिजत होता…

गेली चार महिने मला काढण्याचा कट शिजत होता.सातत्याने मला कुठे तरी पकडायचे आणि पदावरून डच्चू द्यायचा होता. पक्षात आलेल्या नव्या ताई सुषमा अंधारे आणि सुजीत मिणचेकर यांचे चांगले सख्य आहे. मिणचेकर हे मध्यंतरी शिंदे गटाची चाचपणी करत होते. त्यांना अंधारेताईंना मातोश्रीवर बोलून घेतले आहे. शिंदे गटाकडे जात नाही. या विभागाचे जिल्हाध्यक्ष जाधव आहे. त्यांना पदमुक्त केले तर मी आपल्याबरोबर थांबतो, असे मिणचेकरांचे म्हणणे होते. त्या पद्धतीने अंधारे व मिणचेकर यांचे एेकूण पक्षप्रमुखांनी माझ्यावर फार मोठा अन्याय केला असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

तुमच्याबद्दल अंधारे यांचा अंदाज चुकला का ? या प्रश्नावर जाधव म्हणाले, मिणचेकर आणि त्यांचे सख्य जवळचे होते. मिणचेकर हे मला सातत्याने पाण्यात पाहत होते. त्यांना घरातून, खेड्यातून आणून आमदार केले आहे. ते विसरले आहेत. फायरब्रॅण्ड नेत्यांनी अप्पासाहेब जाधवांना काढले आहे. अप्पासाहेब जाधवांना त्यांना प्रसाद दिला आहे. बीडची वाट लावून टाकली आहे. आता पश्चिम महाराष्ट्राकडे वळल्या आहेत. काल परवा शिवसेनेत येऊन आम्हाला शिकवू नये. बाळासाहेबांचा शिवसेनेचा 80 टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असा विचार आहे. हेच काम मी करत आहे. 2005 मध्ये शिवसेना नारायण राणेंमुळे फुटली. आता दीड-दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यामुळे पक्ष फुटला आहे. त्यानंतर मी जयसिंगपुरला खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मोठा मोर्चा काढला. त्यावेळी माझा ब्लडप्रेशर वाढून मला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्याच्या निष्ठेचे फळ मला मिळाले आहे, असे मला वाटते.

आम्ही फक्त पोस्टर लावायचे का ?

राजकीय तोडजोड कराव्या लागतात ? या प्रश्नावर जाधव म्हणाले, मी अनेकदा पक्षप्रमुखांकडे याबाबत तीव्र विरोध केला आहे. शेट्टींना जागा देऊन बाकीच्या शिवसैनिकांनी खळ पोस्टर लावायचे आहे का ? त्यांनी इच्छा व्यक्त करायची नाही. त्यांनी आमदार, खासदार व्हायचे नाही का ? हे लोक येतात, निवडून जातात. 2009 ला रघुनाथ पाटील आले. 2014 ला राजू शेट्टी निवडून आले आणि निघून गेले. 2019 ला धैर्यशील माने आले आणि निघून गेले आम्ही काय करायचे. शिवसैनिकांनी केवळ खळ पोस्टर लावायचे आहे का ? आमच्या काही भावना नाही का ? आम्ही इच्छा व्यक्त करायच्या नाहीत का ? आम्ही केवळ खळ पोस्टर लावायचे का. आम्ही नुसते शिवसैनिकच राहायचे का असे सवालही जाधवांनी उपस्थित केले.

राजू शेट्टींना असलेला विरोध ठाकरेंच्या कानी घातला का ? यावर जाधव म्हणाले, राजू शेट्टी यांना विरोध असल्याबाबत आणची मतदारसंघात बैठक झाले आहे. तालुकाप्रमुखांनी कल्पना दिली होती की आपले जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव हे लढण्यास सक्षम आहेत. आपल्याला राजू शेट्टी नको आहेत. असा पत्रव्यवहार करण्यात आला होता आणि तोंडीही पक्षप्रमुखांना सांगण्यात आले आले.

आता जाधवांची भूमिका काय ?

सध्या माझी वेट आणि वॅचची भूमिका आहे. पदावर काढले आहे. पक्ष अजून सोडलेला नाही. एकनाथ शिंदे किंवा इतर कुणाचा मला फोन आलेला नाही. मी निष्ठावंत आहे. अन्याय झाला असला तरी वाट बघू. उद्धव ठाकरे हे मार्ग काढतील, अशी माझी भावना आहे. हाडाचे काडे करून काम केले आहे. महाराष्ट्रातील एक तरी जिल्हाप्रमुख दाखवा, अशा पद्धतीने काम करणार, अशी भूमिका जाधव यांनी मांडली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube